आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी येथे ‘जनता दरबार’ संपन्न. 250 हून अधिक तक्रारी प्राप्त.
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी ता. कोरेगाव येथे ‘जनता दरबार’ संपन्न. 250 हून अधिक तक्रारी प्राप्त. बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा
34 लाभार्थ्यांना शिधापत्रिका, अंत्योदय योजनेतून 14 महिलांना साडी वाटप.
सातारा दि 20:- रवी वाकडे
आर्वी ता. कोरेगाव येथे सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार *मनोजदादा घोरपडे* यांच्या अध्यक्षतेखाली आर्वी येथे भव्य *‘जनता दरबार’* आयोजित करण्यात आला. या दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
*प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती*
यावेळी प्रांताधिकारी *प्रमोद कुदळे*, तहसीलदार *संगमेश कोंडे*, गटविकास अधिकारी *सुप्रिया चव्हाण मॅडम*, भूमी अभिलेख अधिकारी *संजय कदम* यांच्यासह महसूल, पुरवठा, एमएसईबी, जलसंपदा, आरोग्य, वन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामविकास, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण इत्यादी विभागांचे सर्व खातेप्रमुख, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*मान्यवरांची उपस्थिती*
याप्रसंगी ज्येष्ठ नेते *शंकर पाटील*, *तात्यासाहेब साबळे*, *श्वेताताई गायकवाड*, *सोमनाथ निकम फौजी*, *भगवान कदम*, *कृष्णत शेडगे मामा*, *अमोल कदम*, *श्रीकांत माळी*, *सिताराम गायकवाड आप्पा*, *कल्याण जाधव*, *उद्धव जाधव*, *सचिन इंगळे*, *वीरेंद्र डोंबे*, *सतीश जाधव*, *चंद्रकांत गायकवाड*, *विघ्नेश पवार* आदी मान्यवर व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*250 हून अधिक तक्रारींचे निवारण*
जनता दरबारात महसूल, पुरवठा, एमएसईबी, जलसंपदा, आरोग्य, वनविभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण अशा विविध विभागांच्या *250 हून अधिक तक्रारी* प्राप्त झाल्या. यापैकी *बहुतांश तक्रारींचा जागेवरच निपटारा* करण्यात आला. उर्वरित तक्रारी प्रशासकीय नोंदी तपासून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिले.
*लाभार्थ्यांना लाभ वाटप*
यावेळी *34 नवीन लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप* करण्यात आले. तसेच *अंत्योदय योजनेतून 14 लाभार्थी महिलांना साडी वाटप* करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार घोरपडे म्हणाले, "जनतेच्या समस्या थेट ऐकून त्या सोडविणे हाच जनता दरबाराचा उद्देश आहे. प्रशासनाने नागरिकांप्रती संवेदनशील राहून काम करावे. पुढील काळातही अशा दरबारांचे आयोजन केले जाईल."
Comments
Post a Comment