इंदोली गोळीबार प्रकरण: पोलिसांची धडाकेबाज कारवाई,आरोपी 24 तासाचे आत गजाआड दोन्ही आरोपी अटकेत.स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई.
दिनांक 19 :- रवी वाकडे
इंदोली गोळीबार प्रकरण: पोलिसांची धडाकेबाज कारवाई,आरोपी 24 तासाचे आत गजाआड दोन्ही आरोपी अटकेत.स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई.
जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार करुन फिर्यादीस गंभीर जखमी केल्यानंतर अहिल्यानगर येथे पळून गेलेले पोलीस अभिलेखावरील आरोपी 24 तासाचे आत गजाआड.
दिनांक 17/7/2026 रोजी रात्री 11.45 वा. च्या सु. मौजे पेरले गावच्या हद्दीत इंदोली ब्रीज जवळील पाणंद रस्त्यावर पोलीस अभिलेखावरील आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण रा. कालगाव ता.कराड जि.सातारा याने फिर्यादी संतोष शंकर घोलप वय 37 वर्षे व्यवसाय इंप्पर वाहतुक सप्लायर मुळ रा. कालगाव ता. कराड जि. सातारा यास फोन करून पैशाचा व्यवहार मिटवु असे सांगून बोलावुन घेतले आरोपी सोमनाथ चव्हाण याचा साथिदार योगेश सुदाम दिक्षीत याने फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी दिली, आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण याने त्याच्या फॉच्युनर कारमधुन पिस्तुल काढुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या हेतूने त्यांच्यावर दोन राऊंन्ड फायर केले ते चुकवित असताना फिर्यादी यांच्या उजव्या व डाव्या पायाला गोळ्या लागुन ते गंभीर जखमी झाले म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन उंब्रज पोलीस स्टेशन गु.र.न. 297/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 49,351 (3), 352,3 (5) शस्त्र अधिनियम कलम 3(1), 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3)/135 अन्वये दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी तातडीने गुन्हयातील पोलीस अभिलेखावरील आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, स्थागुशा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले.
दिनांक 18/07/2026 रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की नमुद गुन्हयातील दोन्ही आरोपी अहिल्यानगर येथे पळून गेले आहेत. त्या अनुशंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी व उंब्रज पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकास अहिल्यानगर येथे जावून आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने अहिल्यानगर येथे जावून तांत्रिक विश्लेषन व साक्षीदार यांचेकडे विचारपूस करुन नमुद आरोपींचा शोध घेतला असता सदरचे आरोपी हे साई सुर्या हॉटेल कायनेटीक चौक अहिल्यानगर येथे लपून बसले असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपास पथकाने हॉटेल साई सुर्या कायनेटीक चौक अहिल्यानगर येथे जावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी उंब्रज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून “जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलामधून दोन गोळया फायर करुन फिर्यादीस गंभीर जखमी करणाऱ्या व गुन्हा करुन अहिल्यानगर येथे पळून गेलेल्या पोलीस अभिलेखावरील आरोपी १) सोमनाथ रमेश चव्हाण रा. कालगाव ता.कराड जि.सातारा व त्याचा साथिदार २) योगेश सुदाम दिक्षीत रा.मसूर ता.कराड जि.सातारा यांना 24 तासाचे गजाआड केले .”
श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, उंब्रज पोलीस सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, रमेश ठाणेकर पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजीत भोसले, अमित झेंडे, स्वप्निल शिंदे, किरण जगताप, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, महेश निर्मळ, इरफान मुलाणी, विजय निकम उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय धुमाळ, श्रीधर माने यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे


Comments
Post a Comment