सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरून .दिनांक 15 जुलै रोजी पंढरपूरकडे पायी वारी दिंडीचे प्रस्तान.
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरून .दिनांक 15 जुलै रोजी पंढरपूरकडे पायी वारी दिंडीचे प्रस्तान.
मसूर दि १४ :- रवी वाकडे
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरून .दिनांक 15 जुलै रोजी पंढरपूरकडे पायी वारी दिंडीचे प्रस्तान.
आदरणीय पी .डी .पाटीलसाहेब यांच्या स्मरणार्थ, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना व परिसर यांच्या सौजन्याने, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, यशवंतनगर ते पंढरपूर श्री संत गाडगेनाथ महाराज आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती दिंडी सोहळा कमिटीच्यावतीने काका गुरूजी, अशोकराव थोरात, अमृतराव थोरात, बाजीराव थोरात, शिवाजीराव जाधव, हणमंत महाराज अंतवडीकर, बाजीराव थोरात यांनी दिली. या दिंडी सोहळ्यामध्ये नडशी, शिरवडे, तासवडे, यशवंतनगर, कोपर्डे हवेली, वराडे, रिसवड, अंतवडी, वडोली (नि.), बेलवडे ह., शिवडे, वहागांव, घोणशी, कवठे, हनुमानगांव पाचूंद, तळबीड आदी गांवचे भाविक सहभागी होणार आहेत.
हि दिंडी यशवंतनगर येथून दि. 15 जुलै, 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता मार्गस्त होणार असून शहापूर, अंतवडी, उंचीठाणे, वडूज (काळेवस्ती), गोंदवले बु., पंतवस्ती म्हसवड, पिलीव, भाळवणी, गादेगांव फाटा या मार्गे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.प्रारंभी सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दिंडी-पालखीचे पुजन करण्यात येणार आहे. दिंडी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी संतपंगत, भजन, भारूड, किर्तन सेवा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. परिसरातील भाविक भक्तांनी या दिडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दिंडी सोहळा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.


Comments
Post a Comment