हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये ई.11 वी विज्ञान शाखेचे शानदार उद्घाटन.या विज्ञान शाखेमुळे कॉलेज चे नाव उज्वल होईल.- नगराध्यक्षा सौ.रेखा माळी
हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेज मध्ये ई.11 वी विज्ञान शाखेचे शानदार उद्घाटन.या विज्ञान शाखेमुळे कॉलेज चे नाव उज्वल होईल.- नगराध्यक्षा सौ.रेखा माळी यांचे प्रतिपादन.
सातारा,दि.10 - प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,मध्ये ई.11 वी विज्ञान शाखेचे शानदार उद्घाटन गुरुवार, दि.9 रोजी स.10 ते दु.11.30 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी सुरुवातील नवीन डिजिटल पॅनेल बोर्ड खोलीचे उद्घाटन पूजन करून व फित कापून डॉ.हनुमंत मासाळ यांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर मा. जि. प.सदस्य एन.एस.उर्फ बंडा गोडसे सर यांच्या हस्ते ॲक्रीलीक व डिजिटल बोर्ड चे सादरीकरण सिल्क पडदा आच्छादन दोरीने सरकवून करण्यात आले.या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक सतीश शेटे यांच्या हस्ते विद्यादेवी श्री सरस्वती देवी प्रतिमा पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या नंतर उपस्थित सर्व मान्यवरांना स्थानापन्न करण्यात आले.
या नंतर प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम यांनी सर्वांचा यथोचित शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ ,गुलाब फुले देवून सन्मान केला .यावेळी एकोफोनिक साऊंड सिस्टीम वर स्वागत गीत सादर करण्यात आहे.या नंतर प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम यांनी आपले प्रास्ताविक केले.त्या म्हणाल्या की,गेले अनेक दिवस पालक वर्गातून या ज्युनिअर कॉलेज मध्ये विज्ञान शाखा सुरू व्हावी अशी आग्रही मागणी होत होती.आज ती मागणी पूर्ण होत असून,या उद्घाटन प्रसंगी सर्वांना अतिशय आनंद वाटत आहे.
निमंत्रित मान्यवर मनोगतात,विद्यार्थिनी निकिता भोसले हिने शाळे बद्दल सुहृद मनोगत व्यक्त केले.या नंतर प्रा .डॉ. पी. डी.कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,विज्ञान शाखा सुरू झाले मुळे आता स्पर्धा परीक्षा मध्ये विद्यार्थी यशस्वी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल.यातूनच पुढील भावी अधिकारी तयार होतील.या नंतर माजी प्राचार्य एम.एम.घार्गे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,विज्ञान शाखा शुभारंभ मुळे या ज्युनिअर कॉलेज ला परिपूर्णता आली.त्याचा लाभ शाळा संकुलाला होणार आहे.या नंतर माजी प्राचार्य एम.एस.गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,गेले गेले दिवस विज्ञान शाखे साठी प्रयत्न चालू होते.त्याचे फळ आजच्या या दिवशी दिसून येत आहे.त्यामुळे आनंद वाटत आहे.या नंतर मा.तंत्रस्नेही प्राचार्य सुधाकर माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की, सन 1992 पासून या शाळा संकुलाशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे.या नवीन विज्ञान शाखा शुभारंभ झाले मुळे या शाळेच्या वैभवात मोठी भर पडून,शैक्षणिक प्रगती साठी मोठे पोषक वातावरण तयार होणार आहे.या नंतर मा.जि. प.सदस्य प्रा.एन.एस.गोडसे सर म्हणाले की,या शाळा संकुलाला हुतात्म्यांच्या बलिदानाची खूप मोठी पुण्याई प्राप्त झाली असून,त्याचे फलित म्हणजे आज या शाळा संकुलात विज्ञान शाखेचा शुभारंभ होत आहे.यासाठी आमच्या सर्वांचे सर्वोपतरी सहकार्य राहील.या नंतर वडूजच्या नगराध्यक्षा सौ.रेखा माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की,या विज्ञान शाखे मुळे या शाळा संकुलाच्या शैक्षणिक वैभवात भर पडली असून,यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा.या नंतर संस्था चेअरमन गोविंद भंडारे म्हणाले की,या विज्ञान शाखेसाठी वारंवार मुंबई,पुणे,कोल्हापूर,सातारा या गावी अनेक वेळा जावे लागले.परंतु मनातील विज्ञान शाखा सुरू करण्याची प्रबळ इच्छा आज पूर्ण झाले मुळे खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे.या नंतर कार्यक्रम अध्यक्ष सतीश शेटे म्हणाले की,या विज्ञान शाखा शुभारंभ मुळे शाळेच्या नाव लोकिकात भर पडली असून, हि केवळ तांत्रिक बाब नसून,विद्यार्थांना चांगल्या प्रकारचे शिक्षण सर्वात आधी देण्याची या शाळेची परंपरा पुढे अखंड चालू राहणार आहे.
या कार्यक्रमाला कार्यकारी नगराध्यक्ष अनिल माळी,नगर सेवक गणेश गोडसे,श्रीकांत काळे,रवींद्र काळे,माजी प्राचार्य ए.टी.काळे,अशोक वाघमोडे,सुरेश औटे,दिलीप फडतरे,शिवाजी जाधव, प्रा.बी.डी.बागल पी.आर.शिंदे, प्रदिप देशमुख,संस्था उपाध्यक्ष विजय म्हामणे,सचिव सचिन काळे,शाळा समिती अध्यक्ष संतोष कांबळे,सुभाष येवले, डॉ.हेमंत पेठे,अशोक भंडारे,गजानन शेटे,प्रशांत शेटे,नितीन जाधव,संजय येवले,शैलेश देशपांडे, डॉ.गिरीश जोशी,रविराज काळे, प्रा. प्रमोद जोशी, किरण देशमुख,संपादक धनंजय क्षीरसागर,विक्रम काळे,पत्रकार विनोद लोहार,महेश गिजरे,सचिन गुरव , संतोष इनामदार,उप प्राचार्या सौ.एस.पी.जोशी मॅडम, मुख्याध्यापिका शितल शिंदे मॅडम,पर्यवेक्षक ए.एम.राऊत,व्हि.टी. पवार, प्रसाद जगदाळे यांच्यासह अनेक राजकीय,सामाजिक, वैद्यकीय,कृषी,ऑटो मोबाईल क्षेत्रातील मान्यवर पालक, शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर हजर होते.यावेळी डिजिटल पॅनेल बोर्ड वर तंत्रस्नेही शिक्षक ज्ञानेश्वर लहारे व प्रसाद काळे यांनी सर्व मान्यवर यांना प्रगत तंत्रज्ञान अंतर्गत अध्यापन पद्धतीचे सादरीकरण अतिशय उत्तम संचालन करत दाखवले.शेवटी सर्वांना, अल्पोपहार ,पेढे ,चहा बिस्कीट वाटप करण्यात आले.या सर्व कार्यक्रम वेळी आकर्षक रंगीबिरंगी रांगोळ्या काढण्यात येवून,फुलांची सुशोभित आरास करण्यात आली होती.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. संदिप तिवाटणे व आभार प्रदर्शन प्रा.अजय शेटे यांनी केले.
Comments
Post a Comment