शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर मध्ये शरण साहित्य अध्यासन केंद्र इमारतीचा लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन.


शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर मध्ये शरण साहित्य अध्यासन केंद्र इमारतीचा लोकार्पण व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन.
सातारा, दि.5 - प्रा.अजय शेटे.
जिल्हा नियोजन आणि विकास समिती,कोल्हापूर यांच्या निधीतून बांधलेल्या शरण साहित्य अध्यासन केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा मा.पालक मंत्री,कोल्हापूर मा.प्रकाश आबिटकर साहेब यांच्या शुभ हस्ते व शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर चे कुलगुरू मा.प्रा. डॉ. राजनीश कामत, यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.हसन मुश्रीफ व उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण  तथा संसदीय कार्य मंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील साहेब
मा. आ.सतेज पाटील, मा. आ. डॉ.विनय कोरे,प्रा. डॉ.ज्योती जाधव,प्रा. डॉ.तृप्ती करेकट्टी , डॉ.विलास शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवार, दि.8 जून,2026 रोजी स.10 वा.शरण साहित्य अध्यासन केंद्र इमारत प्रांगण,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.


तरी सदर कार्यक्रमाला सर्व शरण अभ्यासक यांनी वेळेत हजर रहावे,असे आवाहन  श्री.राजशेखर तंबाके,सौ.सरला ताई पाटील, मा.शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य ॲड.अभिषेक मिठारी , प्रा.चारुशीला तासगावे,श्री.सुभाष महाजन, यश आंब्रोळे,तसेच इतर सर्व  स्थानिक पदाधिकारी  कार्यकर्ते यांनी केले आहे.

Comments