आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब एक दुरदृष्टी लाभलेले अलौकिक व्यक्तीमत्व १ जुलै हा त्यांचा जयंती दिन, त्यानिमित्ताने त्यांचे चरणी शब्द फुलांची आदरांजली.
आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब एक दुरदृष्टी लाभलेले अलौकिक व्यक्तीमत्व १ जुलै हा त्यांचा जयंती दिन, त्यानिमित्ताने त्यांचे चरणी शब्द फुलांची आदरांजली.
कराड दि ०१ :- रवी वाकडे
आयुष्याच्या प्रदिर्घ वाटचालीत भरीव यश संपादन करताना अनेक समवयस्क नेत्यांनी व नवनवीन कार्यकर्त्यांनी दिलेली मोलाची साथ महत्त्वाची असते, अनेक संस्था संघटना यांच्या वाटचालीत त्यांचे खंबीर व धिरोदात्त नेतृत्व हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देते, आपल्या कार्याचा आलेख हा केवळ राज्यातच नव्हे तर देश पातळीपर्यंत उंचावला. समाज जीवनाची वाटचाल निष्ठा, त्याग व कर्तृत्व यांच्या त्रिवेणी संगमातूनच आयुष्यभर परिपूर्णतेने केली ते कराड शहर व तालुक्याचे मार्गदर्शक व या संपूर्ण परिसराला नवजीवन प्राप्त करून देणारे व्रतस्थ समाजपुरुष आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांचा आज जयंतीदिन त्यानिमित्ताने.....
१ जुलै १९१८ रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साहेबांचे कर्तृत्व म्हणजे "इवलेसे रोप लावीयेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी "असे आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असून अनेकांच्या जिवनात शैक्षणीक, सामाजीक, आर्थीक परिवर्तन झाले आहे, त्यामुळे ते अलौकिक दुरदृष्टीचे नेते ठरलेले होते. आदरणीय साहेबांनी आपल्या जिवनात ठरवले त्या त्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास केला व त्यातून अलौकीक गोष्टी निर्माण केल्या व करताना ते कधीही माझ्यामुळे झाले असे कधी ते म्हणाले नाहीत. कोणत्याही प्रकारचा अहंकार मनात धरला नाही. नेहमी विनम्र पणे समाजाची सेवा केली हे त्यांचे थोरपण सर्वांनाच ज्ञात आहे. तसेच ज्याज्या गोष्टी करावयाचे ठरवले त्या पूर्ण केल्या व त्याचा उपयोग सर्व सामान्यांना झाल्याचे दिसून येते हे करताना विनम्रपणे लोकसेवा घडावी हा त्यांचा आदर्श होता त्यांनी शैक्षणीक क्षेत्रामध्ये जे काम उभे केले त्यातून हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले व सबंध आयुष्यभर समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून कामामध्ये देव साहेबांनी पाहीला सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेताना त्यास कधी राजकारणाचा वास लागू दिला नाही.
आदरणीय पी. डी. पाटील साहेबांचा रचनात्मक दृष्टीकोन एवढा महान होता की त्यातून उभारलेली अनेक शिल्पे पाहता त्यातून केलेल्या कामाचा आनंद मोठ्या प्रमाणावर होतो याची प्रचिती त्यांना आली होती. तसेच कोणतेही कार्य एकीने केल्यास त्यामध्ये निश्चित सामर्थ्य निर्माण होते हा त्यांचा नेहमी आट्टाहास राहीला. कराड शहर नेहमी स्वच्छ सुंदर रहावे यासाठी भुयारीगटर योजना, मोठे रूंद रस्ते, नगरपालीका इमारत, यशवंतराव चव्हाण टाउन हॉल, शिवाजी स्टेडीयम, यशवंतराव चव्हाण साहेबांचे समाधीस्थळ इत्यादींची मोठी रचना केली तसेच शेती सिंचनासाठी मोठ्या लिफ्ट इरिगेशन योजना उभारून धरणीमाता हिरवी गार करण्याचे काम उभे केले त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. आदरणीय साहेबांनी ज्यापध्दतीने कराङ शहर आणि कराङ उत्तर चा सर्वांगिण विकास केला आहे ते पाहता साहेब हे वास्तविकतेचा विचार करणारे, दूरदृष्टी असणारे, अभ्यासू असे व्यकतीमतव होते. साहेबांनी कराङ शहर आणि कराङ उत्तर मधे विकासकामे करत असताना फक्त आणि फक्त एकाच तत्वाचे पालन केले ते महणजे त्यांनी कोण चुक आणि कोण बरोबर आहे" हे न पाहता "काय चुक आणि काय बरोबर आहे" याकङे कटाक्षाने लक्ष दिले. त्याद्रुष्टीने काय चुक आहे यामधे सुधारणा करून काय बरोबर आहे याचा सतत पाठपुरावा आणि अभ्यास करून विकासकामे केली. त्यांच्या या तत्वामुळे साहेबांचे राजकीय विरोधक ही साहेबांचा आदर करताना दिसायचे म्हणून आदरणीय साहेबांना"लोकनेते" असे संबोधतात.
यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला होता, राजकीय पोकळी निर्माण झाली होती, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जवळचे विश्वासू सहकारी व परिपक्व नेतृत्व म्हणून पी. डी. पाटील साहेबांच्याकडे पाहिले जात होते. चव्हाण साहेबांच्या नंतर दिशा देण्याचा व मार्गदर्शन करण्याचा त्यांचा अभ्यास आणी आवाका मोठा होता. आणि त्यांनी सर्व कार्य प्रामाणीकपणे पार पाडले त्यामुळे साहेबांना कधीही कोणतीही अडचण सामाजीक कार्यात आली नाही. सर्वांशी सौजन्याने वागणे, जवळीक ठेवणे व विश्वास ठेवण्यापुर्वी माणसे पारखणे हि स्वभाव वैशिष्टे साहेबांची होती. साहेबांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू, सर्वांगाने परीपूर्ण राहिले. साहेब आयुष्यभर दुसऱ्यांसाठी मागील ते देण्यासाठी कटीबध्द राहीले. कृष्णा- कोयनेच्या प्रितीसंगमाच्या आकर्षणाबरोबरच त्या परिसराचा सर्वांगीण विकास करून एक आकर्षक पर्यटन केंद्र निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ऐतिहासिक मनोरे हे कराड शहराच्या भव्यतेचे व एकात्मतेचे दर्शन घडवतात. ऐक्याच्या विचाराबरोबरच राष्ट्रीय विचाराच्या चळवळीला प्रोत्साहन व त्या विचारांची जोपासना करीतच सामाजिक बंधुभाव साधणारे ते सर्वस्पर्शी नेतृत्व होते, अशा बहुआयामी व्यक्तीमत्वास सादर प्रणाम व आजच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन........
प्रताप चव्हाण
सिव्हील इंजिनिअर
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर
.jpg)

.jpg)
Comments
Post a Comment