अतिक्रमणा च्या विळख्यातुन उंब्रज बाजारपेठ मोकळा स्वास घेणार काय,????


अतिक्रमणा च्या विळख्यातुन उंब्रज बाजारपेठ  मोकळा स्वास घेणार काय,????
उंब्रज दि:- रवी वाकडे
अतिक्रमणा च्या विळख्यातुन उंब्रज बाजारपेठ  मोकळा स्वास घेणार काय,????
उंब्रज बाजारपेठ मध्ये गेली 10 वर्षा पूर्वी कलेक्टर सो
 सातारा यांच्या माध्यमातून  कमानी च्या डाव्या बाजूला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या च्या  जवळ असणारे दुकान गाळे हे अनधिकृत असल्याने संबंधित सर्व दुकान गाळे काढून टाकले   या घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली त्या नंतर पूर्ण ओसाड झालेल्या बाजारपेठेत परत एकदा हळूहळू  पालाची दुकाने( ग्रामपंचायत च्या सहकार्याने ) सजू लागली  आणि आज याच बाजारपेठ मध्ये संपूर्ण बाजार पेठ ही बेकायदेशीर अनधिकृत रित्या भरून गेली आहे कोणाच्या कोणाच्या आशीर्वादाने   या परिसरात आपले बस्थान बसवले आहे.
  ते एवढे वाढले की गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही कसरत करत गावात यायला लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकांनी पाले टाकून दुकाने थाटली आहेत शाळा सुटली कि या ठिकाणी मुलींना घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक गर्दी करतात  बाजूला मोठ्या प्रमाणात भाजीपाला व्यापारी  तसेच इतर व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात बसत असल्याने  तसेच बाजारात येणाऱ्या लोकांच्या दुचाकी देखील सर्व्हिस रोड पासून कन्या शाळेच्या कोपऱ्या पर्यंत लावल्या जात आहेत आधीच दुकान दारांनी केलेले अतिक्रमण त्या मध्ये अस्ताव्यस्त प्रकारे पार्किंग केलेली वाहने या मुळे संपूर्ण बाजारपेठ हे भरून गेली आहे या ठिकाणी ना शिस्तबद्धता ना सोयी सुविधा हे सर्व करून ग्रामस्थांना येताना जाताना त्रास होऊ नये ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत ची आहे ते या लोकांच्या कडून पैसे घेतात  पण त्याना सिस्थ लावून घेतली जात नाही मग या मूळ ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे ,हे सर्व समोर दिसत असूनही 2 दिवसा पूर्वी अचानक पणे उंब्रज ग्रामपंचायत नि कमानी च्या बाजूला   असणाऱ्या काही ठराविक टपऱ्या काढून टाकल्या आणि   उंब्रज मध्ये नव्या वादाला सुरुवात झाली मग या बाबत बाजारपेठ मधील काही टपऱ्या काढणं आणि  ठिकाणी बेकायदेशीर पणे असणाऱ्या  सर्वच टपऱ्या  काढून अतिक्रणा च्या विळख्यातुन उंब्रज बाजार पेठ मोकळा स्वास घेणार का असा प्रश्न उंब्रज ग्रामस्थांनी केला आहे .
 बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्या ही   अवास्तव पणे पार्क केल्या जात आहेत , यावर ही लक्ष देणे आवश्यक आहे ,
 त्या प्रमाणे बाजारपेठ मध्ये असणाऱ्या सर्व विना परवाना टपऱ्या खोकी  काढली जावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Comments