उंब्रज हॉस्पिटल तर्फे मोफत आजार तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.


उंब्रज हॉस्पिटल तर्फे मोफत आजार तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
सातारा, दि.22-  रवी वाकडे
उंब्रज हॉस्पिटल तर्फे मोफत आजार तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर.
 म.जोतिराव फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत योजना  अशी एकत्रित मान्यताप्राप्त  उपचार सुविधा उंब्रज हॉस्पिटल येथे सुरू झाली आहे.त्या अनुषंगाने आय.सी . यू. अँड डायलिसिस सेंटर तर्फे  मोफत लिव्हर ,पोटाचे आजार यांची तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिर यांचे आयोजन बुधवार,दि.24.06.2026 रोजी दु.12 ते 4 या वेळेत उंब्रज हॉस्पिटल , आय. सी. यु. अँड डायलिसिस सेंटर , शिवरत्न कॉलनी, चोरे रोड,उंब्रज, ता.कराड येथे करण्यात आले आहे.त्यासाठी नाव नोंदणी भ्रमण ध्वनी क्र.7030925446,8605028944 यावर करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांनी पोटांच्या समस्या व विकार व लक्षणे यांच्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान व उपचार करून घेवून ,मोठ्या आजारापासून स्वतःचा बचाव करून घ्यावा.तसेच मोफत गॅस्ट्रोस्कोपी तपासणी साठी शिबिर नाव नोंदणी आवश्यक आहे.
या शिबिरात अन्ननलिकेचे आजार,यकृत / लिव्हर आजार व इतर सभाव्य आजार यावर मार्गदर्शन व उपचार करण्यात येणार आहेत.
यावेळी आयुष्मान भारत कार्ड   नोंदणी करण्यासाठी  आधार कार्ड,तसेच लिंकिंग असलेला मोबाईल नंबर,स्वतः व्यक्ती अथवा त्याचा फोटो उपलब्ध असणे आवश्यक आहे.
तरी सर्व रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा .असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments