हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,वडूज मध्ये जागतिक योग दिन संप्पन्न.


हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,वडूज मध्ये जागतिक योग दिन संप्पन्न.
सातारा, दि.21- प्रा.अजय शेटे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येथील वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित,हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्या बी.एस.माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने हा योग दिन  कार्यक्रम रविवार, दि.21 रोजी स.8 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात आला.

यकार्यक्रमाची सुरुवात सौ.आर.आर. गाडवे मॅडम यांनी संस्कृत श्लोक सुभाषित म्हणून केली.या नंतर योगगुरू सुखदेव सिंह राजपुरोहित यांनी देशभक्ती पर गीत गाऊन,सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी ,शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची योग प्रात्यक्षिके करून घेतली.
या मध्ये सुरुवातीला ध्यान धारणा करून, दिर्घश्वसन,अनुलोम -विलोम, भ्रामरी, ओंकार गुंजन प्राणायाम करण्यात आले.त्या नंतर सर्व सांध्यांना व्यायाम होणारे योग प्रकार करण्यात आले.त्या नंतर सूर्यनमस्कार घालण्यात आले.
संपूर्ण विश्वाला योग साधनेची देणगी देणाऱ्या भारतीय प्राचीन  गुरूंचे स्मरण करून,भारत देश आज जगात एक योग गुरू म्हणून कसे वरिष्ठ स्थान पटकावत आहे आणि मानवी ' निरामय शतायु ' आयुष्याची महती समजावून देत शांतीचा संदेश देत आहे.तसेच आज संपूर्ण जग व भारत यामध्ये सर्व वयाचे विद्यार्थी - विद्यार्थिनी ,तरुण - तरुणी ,सांसारिक,ज्येष्ठ नागरिक ,नेते,अधिकारी योग दिन साजरा करून,एक राष्ट्रीय कार्यक्रम जागतिक पातळीवर यशस्वी करून दाखवत आहेत.याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला  अभिमान वाटत आहे.याचे प्रत्यंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित झाले. असे प्रतिपादन पर्यवेक्षक ए. एम.राऊत यांनी केले.

कार्यक्रम झाल्यानंतर योगगुरू सुखदेवसिंग राजपुरोहित,कार्यक्रम समालोचक राजेंद्र जगदाळे सर यांचा वरिष्ठ शिक्षक श्री.एम. बी.भोकरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,बुके देवून विशेष सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप फडतरे,अक्षय जाधव या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ शिक्षक - शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्व - आरोग्य विकास साधला.

Comments