हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,वडूज मध्ये विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.


हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,वडूज मध्ये विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
सातारा,दि.16- प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित, हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज ता.खटाव, जि.सातारा मध्ये दि.15 जून,2026 रोजी नवीन सह इतर सर्व  विद्यार्थी  वर्गाचा नववर्ष शाळा प्रवेशोत्सव मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
या वेळी ई.5  व ई.8 वीच्या सर्व नवागत विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचे स्वागत वाद्यवृंदाच्या जयघोषात आणि त्यांच्यावर फुलांची व पाकळ्यांची उधळण करत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थी व विद्यार्थांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्था संचालक श्री.सतीश शेटे,अशोक भंडारे,प्रशांत शेटे,ज्ञानेश्वर पंडीत,शैलेश देशपांडे यांच्या हस्ते सर्व विषयांची पुस्तके वाटप करण्यात येवून,त्यांना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग पण हजर होता.
यावेळी शाळा संकुलाच्या प्राचार्या सौ. बी.एस. माने मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की,गेले महिनाभर असलेल्या उन्हाळी सुट्टी मुळे शाळा शांत वाटत होती.पण आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आनंदात व उत्साहात हजर राहिल्या मुळे शाळा परिसर बोलका बनला आहे.त्यामुळे मोठे चैतन्यमयी वातावरण इथे आज पासून सलग वर्षभर  पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.या शाळेत विद्यार्थी मार्गदर्शनाचे सर्व विभाग जाणकार शिक्षक - शिक्षिका यांच्या देखरेखी खाली तयार ठेवण्यात आले असून,सर्व  वार्षिक नियोजन तंतोतंत तयार झाले आहे.त्यातून सर्व विद्यार्थी वर्गाला अभ्यासाचे मार्गदर्शन करण्यात येणार असून,त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेक नवीन नवीन प्रगत उपक्रम  सलग वर्षभर राबवले जाणार आहेत.
या नंतर उपमुख्याध्यापिका सौ .एस. पी.जोशी मॅडम,वरिष्ठ शिक्षक श्री.व्ही.टी.पवार व ए.एम. राऊत सर यांनी विद्यार्थी बैठक व्यवस्था,वाहतूक व्यवस्था व उर्वरित शालेय पुस्तके वाटप या विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती बागल मॅडम यांनी केले.

याच वेळी म.जोतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या नवागत विद्यार्थी वर्गाचेही विद्यादेवी सरस्वती व म.जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वाद्यवृंद वाजवून व फुल पाकळ्यांची उधळण करत जंगी स्वागत करण्यात आले.त्या नंतर  त्यांचा  सुशोभित फुलांची व रंगीबिरंगी फुग्यांची आरास केलेल्या कमानीतून प्रवेश करत शाळा प्रवेश करण्यात आला.यावेळी त्यांना शालेय साहित्य  उपस्थित संस्था मान्यवर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
या वेळी मुख्याधपिका शितल शिंदे मॅडम म्हणाल्या की,गेले महिनाभर शाळा परिसर शांत होता पण आज  पासून विद्यार्थी वर्गाचा किलबिलाट पुन्हा वर्षभर ऐकू येणार असले मुळे आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.यावेळीही सर्व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष गवळी सर यांनी केले.
वरील  सर्व दोन्ही कार्यक्रमांना शिक्षक - शिक्षिका ,पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर होता.

Comments