राकेशराज थोरात यांच्या वाढदिवशी जि.प.प्राथ शाळा हिंगनोळे येथे वृक्षारोपणासह वह्या पेन व खाऊचे वाटप आणि कै रत्नमाला वासुदेव कदम मेमोरिअल उंब्रज हॉस्पिटल ICU येथे पेशंट ना फळे वाटप.


राकेशराज थोरात यांच्या वाढदिवशी जि.प.प्राथ शाळा हिंगनोळे येथे वृक्षारोपणासह वह्या पेन व खाऊचे वाटप आणि  कै रत्नमाला वासुदेव कदम मेमोरिअल उंब्रज हॉस्पिटल ICU येथे पेशंट ना फळे वाटप.
कराड दि 17 :- रवी वाकडे
राकेशराज थोरात यांच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना भेट वृक्षारोपणासह वह्या-पेन व खाऊचे वाटप. हिंगणोळे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व भाजप उंब्रज मंडल उपाध्यक्ष  राकेशराज थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हापरिषद प्राथमिक शाळा हिंगनोळे,  येथे विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन व खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही केले.

 राकेशराज थोरात यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या, पेन व खाऊ देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "शिक्षण हेच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही मन लावून अभ्यास करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री. राकेशराज थोरात यांनी शाळेत विविध झाडांची रोपे भेट म्हणून दिली. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले. "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांच्या संवर्धनाची शपथ दिली.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अजित वाघमारे सर, सर्व शिक्षक-शिक्षिका वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आभार (ग्रामपंचायत सदस्य संतोष थोरात यांनी मानले.
राकेशराज थोरात यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने व स्वतः झाड लावल्याने विद्यार्थी भारावून गेले होते.
आणि कै. रत्नमाला वासुदेव कदम मेमोरिअल उंब्रज  हॉस्पीटल उंब्रज येथे पेशंट ना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी उपस्थित उंब्रज हॉस्पीटल च्या संस्थापिका डॉ वर्षाराणी कदम
संतोष थोरात ग्रामपंचायत सदस्य, वि.से.सोसा माजी चेअरमन अमोल सरकाळे, उपसरपंच प्रवीण नलवडे हनुमानवाडी, पत्रकार रवींद्र वाकडे, अनिल ढेंबरे.अमित गुरव, विलास पाटील,चंद्रकांत थोरात, यशवंत थोरात, गौरव थोरात, सुशांत थोरात., सूरज थोरात, मधुकर थोरात हे होते..

Comments