रेल्वेच्या हद्दीत विकासकामाना गती आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश.
कराड दि 16 :- रवी वाकडे
रेल्वेच्या हद्दीत विकासकामाना गती आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रेल्वे विभागाचे बांधकाम प्रमुख माधव जाधव यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात रेल्वेची हद्द मोठ्या प्रमाणात आहे. सध्या चालू असलेल्या विस्तारीकरणामुळे अनेक ठिकाणी नागरिकांशी गैरसोय झालेली असून त्या ठिकाणी काम करायचे असेल तर रेल्वे प्रशासनाची परवानगी लागते. त्यामुळे काम करण्यास अडचणी निर्माण होत असतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी व लोकांच्या मनाची सोय होण्यासाठी लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मतदारसंघातील महत्त्वाचे असलेले नेहरवाडी–रहीमतपूर रस्ता, टकले रस्ता तसेच तारगाव–वाठार रस्ता या कामांचा प्रगती आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित कामे जलद गतीने पूर्ण करण्याबाबत आमदार घोरपडे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तसेच रेल्वे मार्गालगतच्या इतर प्रलंबित विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली. कराड उत्तर मतदारसंघातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक समन्वय ठेवून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीमुळे मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment