श्री सहस्त्रचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळा संपन्न.वेद सामाजिक संस्थेचा दैवी व अध्यात्मिक उपक्रम.


                 
श्री सहस्त्रचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळा संपन्न.वेद सामाजिक संस्थेचा दैवी व अध्यात्मिक उपक्रम.
     
              

सातारा, दि.08- प्रा.अजय शेटे.
 पवित्र अधिक पुरुषोत्तम मासा निमित्त ,सोमवार दि.1ते रविवार दि.7 जून अखेर वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था व श्री.चित्तरंजन खटावकर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वेद मंगल कार्यालय, वडूज येथे आयोजित केलेल्या श्री सहस्त्रचंडी महायज्ञ अनुष्ठान सोहळ्याचा समारोप व ' वेदाचार्य' पुरस्कार सोहळा श्री क्षेत्र सज्जनगड संस्थान व श्री समर्थ रामदास स्वामी यांचे वंशज भूषण स्वामी रामदासी महाराज ,जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद झांबरे, वेदमूर्ती बाळासाहेब खटावकर यांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात करण्यात आला.यावेळी ' वेदाचार्य' पुरस्काराने वेदाचार्य बाळकृष्ण कापडी, कणकवली,प्रा.सुहास जोशी, कोल्हापूर, किर्तन रत्न पुरस्काराने ह.भ.प.बबन कदम महाराज, हिंगणगाव,समाज भूषण पुरस्काराने दिपगंगा उद्योग समूह,उद्योजक राजन फराटे, बारामती,रहिमतपूर-पिंपरी चे अनंत साबळे ,कडेपूरचे हिंदुराव यादव,अकलूजचे  प्रसाद सुरेश कुलकर्णी , वेदसेवक अथर्व उपासनी, नाशिक,अभय कुलकर्णी , कल्याण यांना शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून  पुरस्काराने गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक धनंजय क्षीरसागर यांनी केले. आभार प्रदर्शन वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर शास्त्री यांनी केले.

                                  

गेले आठवडाभर या सोहळ्या निमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान युगात रमलेल्या युवकांना शारीरिक,मानसिक,सामाजिक,भावनिक व कौटुंबिक निरोगी आरोग्य लाभण्यासाठी समुपदेशन करण्यात आले.अनेक प्रकारची संकटे व आपत्ती यांना तोंड देणारी सक्षम  ताकद कशी निर्माण करता येईल,आर्थिक साक्षरता कशी निर्माण करता येईल. याचे मार्गदर्शन करण्यात आले.तसेच महायज्ञाच्या माध्यमातून सांसारिक स्त्री-पुरुष साधकांना आत्मिक व अध्यात्मिक मन शांती मिळून ,साधकांच्या अंतकरणातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी व कुलस्वामिनीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी त्यांच्या हस्ते महान वेदाचार्य शास्त्रींच्या मंत्रघोषाच्या गजरात  होमहवन करण्यात आले.
या पुण्यकाळात अनेक श्रीमान व सौभाग्यवती जोडप्यांनी सलग सात दिवस यज्ञ कर्मात समिधा अर्पण करत सामील होऊन,नावाजलेल्या पुरोहित ब्रम्हावृंदाच्या मंत्रोच्चारात होमहवन करण्याचे पुण्यकर्म साध्य करून घेतले.या सर्व पुण्यकाळात अनेक राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रातील मान्यवर स्त्री -पुरुष, तरूण- तरुणी ,विद्यार्थी वर्ग ,ज्येष्ठ नागरिक यांनी दर्शन घेवून अविस्मरणीय दैवी शक्तीचा अध्यात्मिक लाभ करून घेतला. संस्थे तर्फे उपस्थित सर्व मान्यवर यांना चहा, नाष्टा,अल्पोपहार व महाप्रसाद अन्नदान वाटप करण्यात आले.
वेद सामाजिक संस्थे तर्फे दर वर्षी  व नित्यनेमाने नेहमी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जात असून,त्यामध्ये पर्यावरण संवर्धन,वृक्षारोपण,गरजू स्त्री - पुरुष,आजारी व्यक्ती,विद्यार्थी वर्ग,ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नेहमी मदतीचा हात पुढे करून,त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य वेदमूर्ती चित्तरंजन खटावकर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.त्यामुळे सदर संस्थेला अनेक शासकीय व सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सदर कार्यक्रमास राजमाता कल्पनाराजे भोसले,संग्रामसिंह देशमुख,मा.रणजित देशमुख, कडेपूर प.स.सदस्य दिग्विजय कदम,अनिरुद्ध देशमुख,गिरीश खटावकर,नगरसेवक अभय देशमुख,अमेय खटावकर,सिद्ध नाथ गोडसे,अनिल गोडसे,अशोक पाटोळे,आकाश भोसले यांनी खास भेट देवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Comments