जनगणना अर्जामध्ये लिंगायत धर्माचा उल्लेख करावा : प पुज्य .जगदगुरू चन्नबसवानंद महास्वामीजी यांचे समाजाला आवाहन.


जनगणना अर्जामध्ये लिंगायत धर्माचा उल्लेख करावा : प पुज्य .जगदगुरू चन्नबसवानंद महास्वामीजी  यांचे समाजाला आवाहन.
सांगली दि 05 : रवी वाकडे
 
इतर धर्माप्रमाणे लिंगायत हा देखील धर्म आहे. केंद्र सरकारच्या सध्या जणगणना सुरू आहे. जनगणनेसाठी आलेल्या व्यक्तीने दिलेल्या अर्जामध्ये धर्माच्या रखान्यामधील " इतर " रखान्यामध्ये केवळ "लिंगायत" असा उल्लेख करावा असे आवाहन चंदबसवानंद महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
       चंदबसवानंद महाराज म्हणाले की जनगणना अर्जामध्ये हिंदू ,मुस्लिम, शीख, जैन या धर्माचा उल्लेख आहे. लिंगायत धर्माचा रखाना नाही. परंतु इतर नावाने एक रखाना आहे. या इतर रखान्यांमध्ये लिंगायत समाजातील व्यक्तीने केवळ ' लिंगायत ' असा शब्द वापरावा असे आवाहन त्यांनी केले. 
     ते पुढे म्हणाले पूर्वी आपल्या देशामध्ये लिंगायत धर्माला मान्यता होती. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात ही मान्यता रद्द करण्यात आली आहे. आता महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यामध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर देशात पाच ते सहा कोटी लिंगायत समाज आहे. महाराष्ट्रात लिंगायत धर्माच्या सुमारे १५० पोटजाती आहेत तर कर्नाटकात १०० पोटजाती आहेत. कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माला मान्यता देऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु काही त्रुटी काढून तो प्रस्ताव परत कर्नाटक सरकारकडे पाठवण्यात आला आहे. 

     लिंगायत धर्माला मान्यता मिळावी , अल्पसंख्याक, ओबी सी , महात्मा बसवणा स्मारक यासाठी महाराष्ट्रसह पाच राज्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील २ जून पासून मंगळवेढा ते मुंबई जणगणना लिंगायत संदेश यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेस राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ( बापू)वाले , सुशील जिवने महाराज, सुरेश पाटील , संजय कोरे , ॲड माळी आदी उपस्थित होते.


Comments