कराडात १५ जूनला केदार जगद्गुरुंच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा .सहा शिवाचार्यांची देखील प्रमुख उपस्थिती .


कराडात १५ जूनला केदार जगद्गुरुंच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा .सहा शिवाचार्यांची देखील प्रमुख उपस्थिती .

      

कराड दि ५  : रवी वाकडे 

कराड व परिसरातील भाविकांसाठी सोमवार, दि. १५ जून रोजी नवीन कृष्णामाई मंगल कार्यालयात सामुदायिक इष्टलिंग पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता केदार जगद्गुरुंच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पूजाविधीनंतर सर्वं भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे.यावेळी महाप्रसादाचे आयोजनही केले आहे.




सकाळी ८:३० वाजता केदार जगद्गुरुंचे आगमन होईल. सकाळी ९ वाजता सामुदायिक इष्टलिंग पूजा प्रारंभ होणार असून, सकाळी ११ वाजता पूजा विधी समारोप व आरती होईल. दुपारी १२ वाजता जगद्गुरुंचे आशीर्वचन होईल, तर दुपारी १ वाजता भाविकांसाठी दर्शन सोहळा प्रारंभ होईल. दुपारी १:३० वाजता महाप्रसाद सुरू होईल 




सदरचा धार्मिक कार्यक्रम कराडच्या प्रीतिसंगमा नजीक असलेल्या मंगल कार्यालयात होत आहे. विशेष म्हणजे १५ जून दिवशी अधिक मासाची सांगता होत आहे.योगायोगाने सोमवार व अमावस्या आहे.अन् केदार जगद्गुरुंच्या सानिध्यात सामुदायिक इष्टलिंग पूजा व त्यांच्या दर्शनाचा लाभ सर्वांना मिळणार आहे.

पूजेला बसण्यासाठी संयोजकांकडून ११११ रुपये देणगी निश्चित करण्यात आली आहे. पूजेला बसणाऱ्यांना बेल, फुले व पूजा साहित्य कीट पुरविण्यात येणार आहे. मात्र, दाम्पत्याने येताना तांब्या, ताम्हण, पळी, पंचा सोबत आणावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या पूजाविधीदरम्यान जगद्गुरुंच्या हस्ते १००८ रुद्राक्षांचे वाटप भाविकांना करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष राजू शेटे, कार्याध्यक्ष विनायक विभुते, अध्यक्ष अनिल खुंटाळे, उपाध्यक्ष आर.टी.स्वामी, शिवानंद डुबल, प्रा. प्रमोद सुकरे, संदीप मुंढेकर, सचिव दत्तात्रय तारळेकर, खजिनदार सुनिल महाजन, सहसचिव अमरनाथ कचरे, बंडा जोते यांचेसह संयोजन समितीचे सदस्य कार्यरत आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या पूजेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.




Comments