नाशिकच्या आयुर्वेदाची सावली
डॉ.सौ.संध्याताई राजेंद्रअप्पा तोडकर .
सातारा, दि.03 - रविंद्र वाकडे.
'फॅमिली डॉक्टर ' नावाची बिरुदावली मोठया अभिमानाने मिरवणाऱ्या आणि आज 4 जून रोजी आपल्या आयुष्याची 55 वर्ष पूर्ण करणाऱ्या डॉ . सौ.संध्या तोडकर यांच्या वैद्यकीय कार्याला, सेवेला आणि जिद्दीला मनापासून वंदन करावे ,असे या व्यक्तीचे महान कार्य आहे.
त्यांची वैद्यकीय सेवेतील कारकीर्द समजून घेतल्यावर व त्याची माहिती वाचून घेतल्यावर कोणीही आश्चर्यचकित झाल्या शिवाय राहणार नाही. त्यांनी फक्त एक डॉक्टर नाही, तर नाशिकच्या आयुर्वेदाची चालती, बोलती परंपरा निर्माण केली आहे. तसेच आयुर्वेदीक सेवेला सलग 25 वर्षे आयुष्य वाहिलं आहे.एक आयुर्वेद तज्ञ, समाजसेविका, उद्योजिका, संशोधक अशा विविध कार्यातून त्यांनी आपली स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सिव्हिल हाॅस्पिटल नाशिक येथे सन 2000 पासून ते आज तागायत त्यांनी सलग 25 वर्ष अखंड मोफत सेवा केली आहे.शिवाय अनाथाश्रमात पण त्या दर आठवड्याला गरजू रुग्णांवर एकही रुपया न घेता पूर्णपणे मोफत उपचार करतात.
संपूर्ण तोडकर कुटुंब आयुर्वेदात व्यस्त ,तसे त्यांचे या क्षेञात मोठे योगदान आहे. कोणी मार्केटिंग, कोणी मॅन्युफॅक्चरिंग, कोणी रिसर्च. घरातली चर्चा फक्त 'आयुर्वेद' आणि आयुर्वेद.
माहेरपासून आयुर्वेदाचा वारसा धारण करत, चौथी पिढी पासून हा वसा आता पाचव्या पिढीकडे सोपवण्याची तयारी पण त्यांनी केली आहे.
एक स्त्री म्हणून अनेक भूमिका बजावताना कुटुंबात आलेल्या असंख्य अडचणींना तोंड देत, एकही दिवस खचून न जाता त्यांनी ' व्यवसाय,सेवा, संशोधन आणि कुटुंब ' या चारही लढाया यशस्वी लढवल्या आहेत.आज संपूर्ण कुटुंब त्यांच्यामुळेच आयुर्वेदाशी जोडलं गेलं आहे.
निरपेक्ष वैद्यकीय सेवा देत ,जिथे ॲलोपॅथी हात टेकते, तिथे आयुर्वेद हात देते. हे त्यांनी आपल्या कृतीतून सत्य करून दाखवले आहे.गँग्रीनवरील रामबाण उपचार असो ,अथवा मधुमेहामुळे गँग्रीन झाल्यावर हात-पाय कापण्याची वेळ येते तेव्हा डॉ. तोडकर यांच्या आयुर्वेदिक उपचारांनी गेल्या 26 वर्षांत शेकडो रुग्णांचे अवयव वाचले आहेत. ऑपरेशन टाळून त्यांनी अनेकांना 'जीवदान' दिलं आहे. त्वचारोग विशेषज्ञ,इसब, सोरायसिस, जुने खवडे यावर त्यांची औषधं प्रसिद्ध आहेत.
उद्योजकता वाढवत 'ब्रह्मगिरी हर्बल'च्या माध्यमातून 'आयुर्वेद घराघरात ' हि म्हण सार्थ ठरवत 39 प्रकारची उत्पादने, काढे, गोळ्या, घृत, कॅप्सूल, मलम, टॅब्लेट अशी उत्पादने स्वतःच्या 'ब्रह्मगिरी हर्बल' कंपनीतून निर्मित केली आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत 'झाडे लावणारी डॉक्टर ' म्हणून ख्याती मिळवत ,नाशिक मधील अनेक शाळा - कॉलेजांमध्ये स्वतःच्या खर्चाने मोफत आयुर्वेद औषधी वनस्पतींची नक्षत्र उद्याने निर्माण केली आहेत. पुढच्या पिढीला आयुर्वेद कळावा म्हणून, दुर्धर आजारांवर संशोधन करत ,सतत नवे उपचार शोधणं, रुग्णांच्या नोंदी ठेवणं, आयुर्वेद सिद्ध करणं ,हे काम त्या मोठ्या जिद्दीने पूर्ण करून,रुग्णांना ' निरामय शतायु ' जीवन शैलीचा लाभ करून देत आहेत.अधिक माहितीसाठी
डॉ.संध्या तोडकर,
मो. 9922160314
(गँग्रीन व त्वचारोग तज्ञ, ब्रह्मगिरी हर्बल)
पत्ता- फ्लॅट नं. 11, गोल्डन नेस्ट, गणराज कॉलनी, वंदना पार्कच्या मागे, इंदिरानगर, नाशिक - 422006.येथे संपर्क साधून आरोग्य संपन्न बना.
डॉ. सौ.संध्या तोडकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व भावी जीवनासाठी शुभ चिंतन.
Comments
Post a Comment