हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये ई.10 वी जून 2026 पुरवणी परीक्षा केंद्राचे आयोजन
हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वडूज मध्ये ई.10 वी जून 2026 पुरवणी परीक्षा केंद्राचे आयोजन.
सातारा, दि.15 - प्रा.अजय शेटे.
हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,वडूज येथे ई.10 वी बोर्ड पुरवणी परीक्षा ,जून 2026 चे आयोजन सी.सी.टिव्ही कॅमेरा प्रणाली सह अतिशय तंतोतंत पणे केले असल्याची माहिती केंद्र संचालिका तथा मुख्याध्यापिका सौ. बी.एस.माने मॅडम यांनी दिली.
सदर परीक्षा मंगळवार दि.16 ते मंगळावर दि.30 जून अखेर स.10 ते दु.2.30 या वेळेत एस.एस.सी.बोर्डाच्या नियमांप्रमाणे होणार असून,त्याची उत्तम पारदर्शक तयारी केंद्र संचालिका मुख्याध्यापिका सौ. बी.एस.माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाने या शालेय केंद्रावर केली असल्याची अधिक माहिती उप केंद्र संचालिका तथा उपमुख्याध्यापिका सौ.एस. पी.जोशी मॅडम यांनी दिली.
सदर परीक्षा केंद्र हे सर्व मूलभूत सोयींनी सुसज्ज असून वडूज पंचक्रोशीतील ई.10 वी चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. त्यामुळे आवश्यक ती सर्व तयारी येथे करण्यात आली असून,परीक्षा अतिशय पारदर्शकपणे सर्व नियम व अटी पाळून कॉपी मुक्त अभियान पद्धतीने पार पाडली जाणार आहे.त्यासाठीची सर्व सज्जता इथे तयार ठेवली गेली आहे.
Comments
Post a Comment