शनि जयंती जन्म सोहळा आणि शनि अमावस्या निमित्त भरगच्च कार्यक्रम संपन्न.सातारा,


शनि जयंती जन्म सोहळा आणि शनि अमावस्या निमित्त भरगच्च कार्यक्रम संपन्न.
सातारा, दि.17-  प्रा.अजय शेटे.
पूर्वीचे प्रतिथयश कांदा - बटाटा व्यापारी कै. सुखदेव शेठ लक्ष्मण मंगरूळे यांच्या स्मरणार्थ पेडगाव रोड, वडूज येथे श्री.राहुल मंगरूळे व कुटुंबीय यांनी बांधलेल्या श्री शनि मंदिरात शनिवार, दि.16 रोजी स.6 ते रात्री 10 वाजे पर्यंत श्री शनि जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी स.6 ते 11 वाजे पर्यंत श्री शनिस महातेल व महारुद्र अभिषेक करण्यात आला. दु.12.30 ते 1 या वेळेत महाआरती करण्यात आली त्या नंतर दु.1 पासून प्रसाद वाटप करण्यात आले. दु.5ते 6या वेळेत प्रा.अजय शेटे यांच्यासह सौ. पद्मा शेडे,उर्मिला गोडसे मॅडम, प्राचार्या बी.एस.माने ,प्रदिप शेटे,सोहन मोहोळकर, विजय काळे, प्रकाश माळी, डॉ .संतोष गोडसे डॉ.महेश माने,श्री हरिदास देशमाने, डॉ.महेश गुरव
 यांच्यासह सर्व स्त्री - पुरुष शनी भक्त यांच्या करवी श्री शनि महात्म्य पठण करण्यात आले. सायं.6.40 ला 7.30 या वेळेत श्री शनि जन्म उत्सव व पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.रात्री 7.30 ते 9.30 या वेळेत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भजनी मंडळ यांचे सुश्राव्य भजन झाले.रात्री 10 वाजे पर्यंत कार्यकारी नगराध्यक्ष श्री.गणेश गोडसे यांच्या तर्फे बुंदी लाडू,श्री.सागर भिलारे यांचे तर्फे राजगिरा लाडू व देवस्थान तर्फे गोड लापशी यांचा प्रसाद वाटप करण्यात आला.
या जयंती निमित्त वडूज पोलीस स्टेशन चे पी.आय.घनशाम सोनवणे साहेब यांनी सपत्नीक दर्शन घेतले.महाआरती करण्याचा मान मा.हिंदुराव गोडसे आण्णा, मा. प्रा.एन.एस.उर्फ बंडा गोडसे सर,संपादक धनंजय क्षीरसागर यांना लाभला.सर्व विधी पौराहित्य सचिन कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.ज्योती , चित.ओम व जय व श्री.राहुल मंगरूळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ पासून  अनेक मान्यवर स्त्री - पुरुष भक्त मंडळी यांनी तब्बल 13 वर्षा नंतर शनिवारीच आलेल्या श्री शनि जयंती व अमावस्या अशा एकत्र दुर्लभ योग पुण्य काळात 51 डझन आंब्यांच्या सुशोभित आराशी सह श्री शनि दर्शनाचा लाभ घेवून,प्रसाद ग्रहण केला.

Comments