प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय केंद्रातर्फे श्रेष्ठ अधिक मास व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.
सातारा, दि.18- प्रा.अजय शेटे.
प्रजापिता ब्रम्हा कुमारी सेवा केंद्र, प्रभू वरदान,पेडगाव रोड, शांताई पार्क या ठिकाणी रविवार, दि.17 रोजी स.10 ते दु.2.30 या वेळेत प्रमुख
मार्गदर्शिकाआदरणीय ब्रह्माकुमारी शोभा दिदीजी, संचालिका, ईश्वरपूर सेवाकेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स.10:30 ते 11:00 मेडिटेशन,
11 ते 12 अधिक मास चे आध्यात्मिक रहस्य,
12 ते 12:30 पालकांना मार्गदर्शन,
12:30 ते 1:00 विद्यार्थी अनुभव व नृत्य कार्यक्रम
दु.1:00 प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम, मान्यवर मनोगत
दु.1:30 ते 2.30 या वेळेत ब्रह्माभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी आ. शोभा दिदी जी यांनी 'अधिक मास चे अध्यात्मिक महत्त्व ' या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एन.एस. उर्फ बंडा गोडसे सर,संपादक धनंजय क्षीरसागर, ॲड.राजीव चव्हाण, डॉ.आशिष काळे,प्रा.अजय शेटे,सौ. माई गोडसे, सौ.चंपा काळे ब्रम्हाभोजन दात्या उषा माने,शिक्षिका सुवर्णा सुतार,अशोक जगताप,अर्चना जगताप,किशोर रुद्रुके, वडूज सेवा केंद्राच्या संचालिका राणी दिदी, अरुणा व सारिका बहेन, सचिन शेंडे,जीवन तडाके,दादासाहेब गोडसे,विद्यार्थी - विद्यार्थिनी , माता - पिता पालक यांची विशेष उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment