सातारा पोलिसांच्या समन्वयातून मोठी कारवाई,केरळमधील चैनस्नॅचिंग करणारे तिघे जेरबंद संशयित आरोपी केरळ पोलिसांच्या ताब्यात .तासवडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांचा सापळा.

 


सातारा पोलिसांच्या समन्वयातून मोठी कारवाई,

केरळमधील चैनस्नॅचिंग करणारे तिघे जेरबंद  संशयित आरोपी केरळ पोलिसांच्या ताब्यात .तासवडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांचा सापळा.

कराड दि १४  :- रवी वाकडे

सातारा पोलिसांच्या समन्वयातून मोठी कारवाई,केरळमधील चैनस्नॅचिंग करणारे तिघे जेरबंद  संशयित आरोपी केरळ पोलिसांच्या ताब्यात .तासवडे टोलनाक्यावर तळबीड पोलिसांचा सापळा.

केरळ राज्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पसार झालेल्या आरोपींना तासवडे टोलनाक्यावर अचूक माहिती व पोलिसी चाणाक्षपणाच्या जोरावर तळबीड पोलिसांनी जेरबंद केले. मारुती सुझुकी एर्टिगा कारमधून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या संशयितांना नाकाबंदीत अडवत ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी केरळमधील चैनस्नॅचिंगची कबुली दिल्यानंतर त्यांना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे सातारा पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

मा. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील हेमअंबिका नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैनस्नॅचिंगची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी मारुती सुझुकी एर्टिगा (क्र. एमएच 48 सीटी 4929) या वाहनातून महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये सातारा कंट्रोल रूममार्फत तासवडे टोलनाक्यावर तातडीने नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.




पोलिसांनी तत्काळ समन्वय साधत पोलिस पथकासह टोलनाक्यावर सापळा रचला. नाकाबंदी सुरू असतानाच संबंधित एर्टिगा वाहन दिसताच पोलिसांनी ते अडवून ताब्यात घेतले. वाहनामध्ये तीन संशयित इसम आढळून आले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना वाहनासह तळबीड पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली.

या चौकशीत आरोपींनी केरळ राज्यात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली. त्यानंतर सातारा कंट्रोल रूममार्फत हेमअंबिका नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार केरळ पोलिसांचे अधिकारी व अंमलदार तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर संशयित आरोपी व वाहन केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी हेमअंबिका नगर पोलीस ठाण्यात गुरनं. 383/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) व 3(5) प्रमाणे 12 मे 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे तळबीड पोलीस ठाणे, उंब्रज पोलीस ठाण्याचे API पंकज पवार, तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन गुरव, कुलदिप कोळी, योगेश भोसले पोलीस अंमलदार गणेश बाकले, अभय मोरे, महीला पोलीस अंमलदार स्मिता करपे यांनी सहभाग घेतला.  पोलीस अधीक्षक सातारा श्री.निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी कारवाईत सहभागी पोलिस अधिकारी-अंमलदारांचे अभिनंदन केले.

Comments