मित्र परिवार ज्येष्ठनागरिक संघ,मासिक सभा
कराड येथे संपन्न झाली.
कराड दि १३ :- वसंत शिंदे
मित्र परिवार ज्येष्ठनागरिक संघ,मासिकसभा कराड येथे संपन्न झाली. माहे एप्रिल 2026 ची मासिकसभा गुरूवार दि.30-04-2026 रोजी सायं.5-30ते 08-30 यावेळेत हाॅटेल कृष्णा पॅलेस,कराड येथे संपन्न झाली.गट नं.05 मार्फत यासभेत संघाचे उपाध्यक्ष,सुप्रसिद्ध व्याख्याते मा.श्री.BM शेवाळे सर यांचे संतानी पूजलेला देव या विषयावर सुंदर अध्यात्मिक संवाद,भक्तिपर व्याख्यान-मार्गदर्शन आयोजित केले होते.यावेळी सरानी संत परंपरेतील संत कबीर,नामदेव,ज्ञानेश्वर,तुकाराम,एकनाथ,जनाबाई,मुक्ताबाई,मीराबाई,इ.संतानी समाजाला केलेला उपदेश आणि त्यांनी पाहिलेला देव सांगितला.देव समाजातच असतो.देव नामात असतो.देव प्रत्येक माणसात असतो.देव त्याच्या हृदयात असतो.अंतर्मनात असतो.त्याच्या कर्मात असतो.त्याने चांगले कर्म करावे. कर्म हाच धर्म असतो.देव हा घरा-घरात,घराघरातील माणसा-माणसात असतो.घरातील माणसेच देव आहेत.देव देवळात नसून तो घरात आणि माणसाच्या अंतरंगात असतो.
अशी अनेक उदाहरणे देवून देवाचे अस्तित्व दाखवून दिले.तसेच समाजातील आदर्श गुरू-शिष्य परंपरेचे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांचे उत्तम उदाहरण दिले.हा आदर्श समाजाने आणि समाजातील प्रत्येकाने घ्यावा असे सूतोवाच देखील सरानी जाता जाता केले. सुरूवातीससंघाचे अध्यक्ष खोचीकर सरानी प्रास्ताविक केले.साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म या प्रार्थनेने सुरूवात झाली.या महिन्यातील वाढदिवस असलेल्या सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. श्री.देवकर VV यानी सर्वांचे आभार मानले.गटप्रमुख श्री.VB माने सरानी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ङ् केले.पसायदानानंतर खाली सुग्रास भोजनाचा सर्वानी लाभ घेतला. या सभेस 70 सदस्य उपस्थित होते.



Comments
Post a Comment