सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि.यशवंतनगर आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने,शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि.यशवंतनगर आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने,शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
कराड दि 28 :- रवी वाकडे
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि.यशवंतनगर आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने,शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना लि.यशवंतनगर आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने, कारखाना कार्यक्षेत्रातील वाठार (की) ता.कोरेगाव येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री, कारखान्याचे चेअरमन मा श्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन व त्याहीपेक्षा जास्त उत्पादन घेणे सहज शक्य आहे, त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागामार्फत करण्यात येत आहे, त्याचा लाभ घ्यावा आणि शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगून, कारखान्याने मागील गळीत हंगामामध्ये प्रतिदिन 7500 मे टनावरून प्रतिदिन 11000 मे टनाची विस्तारवाढ यशस्वीरित्या पूर्ण केली असून ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद यांनी पिकविलेला ऊस सह्याद्रिकडेच गळीतास पाठवावा,असे आवाहन यावेळी मा श्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे अग्रोनोमी हेड श्री अरुण देशमुख विभागीय व्यवस्थापक राजकुमार माळी यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खतांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले ,व्हाईस चेअरमन मा श्री कांतीलाल पाटील (तात्या) यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी
कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र पवार कारखान्याचे संचालक युवा नेते जशराज
पाटील (बाबा), राहुल निकम, माजी
संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संभाजीराव गायकवाड (तात्या), तानाजीराव
जाधव, वसंतराव कणसे (गुरुजी), दादाबुवा
गायकवाड, किशोर गायकवाड, सूर्यकांत
पवार, लालासो पवार, अमोल
गायकवाड, राजेंद्र घाडगे, सतीश
भोसले, गोरखनाथ काळे, सतीश
गायकवाड, दत्तात्रय आढाव, शंकर
खामकर, सुरेश गायकवाड, कल्याणराव
गायकवाड, निवृत्ती बोरकर, अर्जुन
बुवा- किरोली, लक्ष्मण गायकवाड, अरुण
नलवडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर
(केन) सुजय पवार, शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, ऊस
विकास अधिकारी संजय चव्हाण, सुरज
घार्गे यांचेसह वाठार किरोली आणि परिसरातील विविध गावचे प्रमुख पदाधिकारी
कार्यकर्ते, ग्रामस्थ, कारखान्याचे
सभासद, अधिकारी, कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment