कराड उत्तरचे जननायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मसूर परिसरातील शेतकऱ्यांकडून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा.


कराड उत्तरचे जननायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मसूर परिसरातील शेतकऱ्यांकडून अनोख्या पद्धतीने साजरा.
कराड दि 27 :- रवी वाकडे
कराड उत्तरचे जननायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त मसूर परिसरातील शेतकऱ्यांकडून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी पोहोचविण्याचे मोठे काम आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आले. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे.

या उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील शेती हिरवीगार झाली असून भाजीपाला, ऊस, फळबागा तसेच विविध पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात आता भरघोस भाजीपाला पिकू लागल्याने आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होत आहे. याच कृतज्ञतेच्या भावनेतून मसूर भागातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला ताजा भाजीपाला आमदार मनोजदादा घोरपडे यांना वाढदिवसानिमित्त भेट देत त्यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
यावेळी शेतकऱ्यांनी “पाणी दिल्यामुळे आमची शेती वाचली, आमच्या कुटुंबाला आधार मिळाला,” अशा भावना व्यक्त केल्या. आमदार मनोजदादा घोरपडे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “शेतकरी समृद्ध झाला तरच ग्रामीण भागाचा विकास होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी भविष्यातही अशाच विकासकामांना प्राधान्य दिले जाईल,” असे सांगितले.
या प्रसंगी पतंगअण्णा माने मा.सभापती, लालासाहेब जगदाळे जिल्हा परिषद सदस्य, कोमल प्रशांत यादव, दिनकर पाटील आबा श्री भानुदास पोळ , श्री. बाळासाहेब जाधव कोयना बँक संचालक ,  पुरंदर जाधव, मधुकर जाधव , संभाजी पवार, सतीश पवार,  प्रवीण आप्पा घोलप, अभिजित पाटील, श्रीकांत पाटील, नितीराज जाधव, बापूसाहेब पवार, इंद्रजीत साळुंखे, सचिन यादव,, मसूर परिसरातील अनेक शेतकरी, ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments