एस.एस. सी. परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाचे दैदीप्यमान यश..कुमारी. ऐश्वर्या अनोखेलाल प्रजापती ९७% गुण मिळवून विद्यालयात प्रथम.
एस.एस. सी. परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाचे दैदीप्यमान यश..कुमारी. ऐश्वर्या अनोखेलाल प्रजापती ९७% गुण मिळवून विद्यालयात प्रथम.
उंब्रज दि. 27 :- रवी वाकडे
एस.एस. सी. परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाचे दैदीप्यमान यश..कुमारी. ऐश्वर्या अनोखेलाल प्रजापती ९७% गुण मिळवून विद्यालयात प्रथम.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.
नेहमीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थिनी पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षेसाठी 127 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. 127 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विशिष्ट प्राविण्यसह 77 विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.
विद्यालयातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थिनी
1)कुमारी. ऐश्वर्या अनोखेलाल प्रजापती--97%
2) कुमारी. अनुष्का भाऊसो पाटील--96.40%
3) कुमारी. समृद्धी संजय देशमाने --95.60%
यांनी विशेष प्राविण्यासह हे संपादन केले आहे. विद्यार्थिनींच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थिनींची मेहनत कारणीभूत असल्याचे विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पाटील सुनिता रतन यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील वर्गशिक्षिका- सौ. जिरंगे वनश्री श्रीकांत व श्रीमती शिंदे कोमल लक्ष्मण सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती, माजी विद्यार्थिनी संघटना, ग्रामपंचायत उंब्रज, पंचक्रोशी ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून विद्यार्थिनींना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या...

Comments
Post a Comment