डॉ.अतिश घेवारे यांचा एटीएस फेलोशिप ॲवॉर्ड ने सन्मान.
सातारा, दि.18- प्रा.अजय शेटे.
वडूज गावचे सुपुत्र व कै.प्रभाकर घेवारे सर यांचे द्वितीय सुपुत्र डॉ. अतिश घेवारे हे सन 2022 पासून, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेंट लुईस, अमेरिका येथे रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.या वर्षी ओरर्लँडो, अमेरिका येथे पार पडलेल्या अमेरिकन थोरँसिक सोसायटी या प्रतिथयश संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना ' एटीएस फेलोशीप ॲवॉर्ड 2026 ने सलग तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ.आतीश हे वडूज शिक्षण विकास मंडळ चे माजी संचालक कै.किसनराव शेटे यांचे नातू,श्रीमती आशा घेवारे यांचे द्वितीय सुपुत्र व संचालक प्रशांत शेटे व उद्योजक विकास शेटे यांचे भाचे आहेत.
त्यांना मिळालेल्या या सलग तिसऱ्या विशेष सन्माना बद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment