अड.रवींद्र केशवराव पवार (भाऊ ) यांची रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज. यांच्यातर्फे अभिनंदन.

अड.रवींद्र केशवराव पवार (भाऊ ) यांची रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज. यांच्यातर्फे अभिनंदन.
कराड दि १५ :- रवी वाकडे
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज. यांच्यातर्फे माननीय अड.रवींद्र केशवराव पवार (भाऊ ) यांची रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी येथील अँड. डॉ.रवींद्र केशवराव पवार यांची सहाव्यांदा निवड झाली आहे. सन-2026 ते2029 या कालावधीसाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार श्री.शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्थेची जनरल बॉडीची मिटिंग झाली. सदस्यांनी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांची निवडणुकीद्वारे निवड केली आहे.
यामध्ये कराडचे अँड.डॉ रवींद्र पवार यांची सहाव्यांदा संस्थेकरिता व शिक्षण क्षेत्रात करत असलेले योगदान व कार्य पाहून मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज च्या सेवकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला. यावेळी कराड पाटण तालुका व संस्थेतील रयत सेवक व रयत प्रेमी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने अँड. डॉ.रवींद्र केशवराव पवार उर्फ भाऊ यांचे अभिनंदन करण्यात आले.व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



Comments
Post a Comment