औषध संशोधनात मोठी झेप – डॉ. अमितकुमार खाडे यांना आंतरराष्ट्रीय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप


औषध संशोधनात मोठी झेप – डॉ. अमितकुमार खाडे यांना आंतरराष्ट्रीय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप.
कराड दि  14 :- रवी वाकडे
औषध संशोधनात मोठी झेप – डॉ. अमितकुमार खाडे यांना आंतरराष्ट्रीय पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप,कराड येथील ह्यूमन या आंतरराष्ट्रीय जर्नलचे मुख्य संपादक तसेच अधिव्याख्याता डॉ. अमितकुमार आनंदराव खाडे यांना आशिया-आफ्रिका डेव्हलपमेंट कौन्सिल आणि पुणे येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप प्रदान करण्यात आली. 
डॉ. खाडे यांनी यापूर्वी २०२४ साली पीएच.डी. पदवी संपादन केली असून त्यानंतर त्यांनी औषध क्षेत्रातील संशोधन कार्य सातत्याने सुरू ठेवले. पारंपरिक औषध दुकानांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑनलाईन औषध दुकानांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी ‘ब्रिक अँड क्लिक मॉडेल ऑफ फार्मसी’ हे अभिनव मॉडेल विकसित केले आहे. या संशोधनामुळे भारतातील सुमारे ९.५० लाख फार्मसींना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ होऊ शकतो. या संशोधनासाठी त्यांना भारत सरकारकडून प्रताधिकार (कॉपीराइट) प्राप्त झाले आहेत. त्यांच्या संशोधन लेखांचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध नामांकित जर्नल्समध्ये झाले आहे.

तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य येथे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना वैद्यकीय सहाय्य मिळत आहे.
या यशामागे त्यांचे मार्गदर्शक डॉ. कुणाल पाटील, डॉ. अविनाश पवार, डॉ. राहुल पोळ आणि डॉ. प्रल्हाद मुदाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments