यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे एस.एस.सी. परीक्षेत यश.
कराड दि. 11 :- वसंत शिंदे
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा(इ१०वी) फेब्रु/मार्च- २०२६ च्या निकालात यशवंतनगर ( ता. कराड) येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयाने गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली असून विद्यालयाचा ९७.६७ टक्के निकाल लागला आहे*
*विराज चव्हाण - ९६.२०, प्रथमेश चव्हाण - ९२.००, श्रुतिका चव्हाण - ९०.२०, वेदांत शिंदे - ८७.२०, वेदांत चव्हाण - ८६.२०, यशराज शेलार - ८६.२०, हर्षद कुंभार - ८५.२०, अथर्व माने - ८४.६०, अथर्व कांबळे - ८३.२०, ईश्वरी जाधव - ८३.२०, विराज शेडगे - ८३.००, जान्हवी जाधव - ८२.६०, युवराज शिंदे - ८२.६०.
टक्के गुण मिळवून विद्यालयात अव्वल स्थान पटकावले*
*विशेष प्राविण्यासह २६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३३ तर द्वितिय श्रेणीत २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.*
सर्व गुणवंत विद्यार्थ्याचे *सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील*, *सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते मा. जशराज पाटील (बाबा)* सह्याद्रि कारखान्याचे संचालक व शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, सचिव संभाजी चव्हाण मुख्याध्यापक ए.एस. राऊत पालक बंधू भगिनी,मार्गदर्शक शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment