ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्राच्या समर कँपचा शुभारंभ.पालकांसाठी राजयोग शिबी राचे आयोजन


ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्राच्या समर कँपचा शुभारंभ.
पालकांसाठी राजयोग शिबी राचे आयोजन.
सातारा, दि.10 -  प्रा.अजय शेटे.
वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथील शांताई पार्क,पेडगाव रोड मधील प्रभू वरदान सेवा केंद्रा मध्ये शनिवार दि.9 ते सोमवार दि.11 रोजी रोज स.9 ते दु.1या वेळेत 7 ते 16 वयोगटातील विद्यार्थी - विद्यार्थिनी साठी ' समर कॅम्प ' चे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा उद्घाटन सोहळा प्रा.अजय शेटे,प्रा.संदिप तिवाटणे , डॉ. विजया फडतरे मॅडम,मायणी ,ॲड.ऋतुजा गोडसे,रोहन फडतरे ,ब्रम्हाकुमारी राणी दिदी, अरुणा दिदी,सारिका दिदी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवर यांचा शुभ वस्त्र व श्री लक्षी-नारायण फ्रेम देवून व अल्पोपहार देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा.अजय शेटे म्हणाले की,या केंद्राच्या माध्यमातून सुरू झालेल्या बाल संस्कार केंद्राच्या समर कँप द्वारे विद्यार्थी वर्गाला स्थितप्रज्ञता प्राप्त होऊन,त्यांच्या वर्तनात आमूलाग्र सकारात्मक बदल होईल,तसेच त्यांना एकाग्रता प्राप्त होऊन स्थिरता प्राप्त होऊन,त्याची आयुष्यभर ज्ञान लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल.
या नंतर प्रा.संदिप तिवाटणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,विद्यार्थी वर्ग या समर कॅम्पच्या माध्यमातून नवीन ज्ञान कौशल्ये आत्मसात करतील ,जी त्यांना त्यांच्या जीवनात उपयोगी पडतील.या नंतर मायणीच्या डॉ. विजया फडतरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की,आताची पिढी खूप भाग्यवान आहे,कारण त्यांना अशा सेवा केंद्राच्या समर कॅम्पचा लाभ घेता येतो आहे.जुन्या पिढीला खूप बंधनात राहून आनंदाच्या अभावात जीवन जगावे लागत होते.परंतु या नवीन पिढीला सर्व काही पालक वर्ग उपलब्ध करून देत आहेत.त्याच बरोबर त्यांना हळू हळू नकार पचवायला पण शिकवले पाहिजे.
या नंतर राणी दिदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की,या समर कॅम्प बाल संस्कार वर्गाचे हे दुसरे वर्ष आहे.या मध्ये एकूण उपस्थित 42 विद्यार्थी वर्गासाठी मोबाईल पासून अलिप्तता,जीवन मूल्यांचे महत्व,योगासन व व्यायाम,सर्जनशील ध्यान, क्रीडा स्पर्धा व क्विझ,कला व सांस्कृतिक उपक्रम शिकविले जाणार आहेत.तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.या नंतर अरुणा दिदी म्हणाल्या की,या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाचा सर्वांगीण विकास होणार असून,त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकसित होणार आहे.
या कँपला ॲड.राजीव चव्हाण ,संपादक धनंजय क्षीरसागर यांनी विशेष भेट देवून शुभ चिंतन व्यक्त केले.
उर्वरित दोन दिवसात सुद्धा कोणाला या कॅम्प मध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी डबा, पाणी बाटली, वही व पेन घेवून संपर्क क्र.7387240152 यावर संपर्क करून,आपल्या पाल्याच्या प्रवेश निश्चित करून,या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.पालक वर्गासाठी पण स 9.30 ते 10.30 या वेळेत ' राज योग ' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्या मुळे पालक वर्ग पण या मध्ये सहभागी होऊ शकतात.

Comments