५ मिनिटांचा चहा ठरला १ तासांचा जनसंवाद”*! अतितचे एस.टी कँटीग झाले आमदारांचे आँफीस”


५ मिनिटांचा चहा ठरला १ तासांचा जनसंवाद”*! अतितचे एस.टी कँटीग झाले आमदारांचे आँफीस”
सातारा दि 06 :- रवी वाकडे
५ मिनिटांचा चहा ठरला १ तासांचा जनसंवाद”*! अतितचे एस.टी कँटीग झाले आमदारांचे आँफीस”
अतित येथे सकाळी पार पडलेल्या सावडण्यांच्या कार्यक्रमानंतर घडलेली एक साधी घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांना चहासाठी आग्रह धरला आणि आमदारांनीही तो मान्य करत एस.टी. स्टँडकडे पावले वळवली.
मात्र, हा चहा केवळ चहा राहिला नाही…
आमदार आले असल्याची बातमी समजताच गावातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने कँटीनकडे धावले. कुणाची पाणी समस्या, कुणाचा रस्ता, तर कुणाचे वैयक्तिक काम — प्रत्येकजण आपली व्यथा मांडण्यासाठी उत्सुक होता.

*मी शासकीय नोकरीस असून माझ्या वैयक्तिक कामासाठी कुटुंबासह पुण्यावरून कोल्हापूरला जात असताना चहा नास्ता करण्यासाठी अतीत बसस्थानकात थांबलो असता आमदार मनोजदादा घोरपडे हे इथे बसून लोकांची कामे करत होते. ते पाहून आमदार साहेबांची भेट घेतली खुपच आपुलकीचे वागणे आणि बोलणे वाटले*
*हणमंत चावरे कोल्हापूर प्रवाशी*
आमदार घोरपडे यांनी कोणताही दिखावा न करता, मागेपुढे न पाहता प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. इतकेच नव्हे, तर आमदारांनी जागेवरूनच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. पाच मिनिटांसाठी थांबलेले आमदार तब्बल दीड तास कँटीनमध्ये बसून जनतेच्या प्रश्नांमध्ये गुंतलेले दिसले.
या अनपेक्षित ‘जनसंवाद’ सत्राने परिसरातील वातावरणच बदलून गेले. येणारे-जाणारे प्रवासीही थांबून हा प्रसंग पाहू लागले आणि आमदारांच्या कार्यशैलीबद्दल कौतुक व्यक्त करू लागले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव पाटील, सिनेअभिनेते समृद्धी जाधव, उद्धव यादव, सुधीर जाधव, संभाजी यादव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Comments