डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन , पणजी, गोवा येथे मोठ्या थाटामाटात संप्पन्न. मा रामकृष्ण वेताळ यांची विशेष उपस्थिती


डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन , पणजी, गोवा येथे मोठ्या थाटामाटात संप्पन्न. मा रामकृष्ण वेताळ यांची विशेष उपस्थिती
कराड दि 05:- प्रा.अजय शेटे.
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार यांचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन पणजी, गोवा येथील कला अकादमी येथे सोमवार दि.4 रोजी स.10 ते संध्या.6 या वेळेत मोठ्या थाटामाटात पार पडले.
या अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मा. डॉ.प्रमोदजी सावंत साहेब यांच्या हस्ते व समाज कल्याण मंत्री मा.सुभाष फळदेसाई,आयुष्मान भारत महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे,भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा.रामकृष्ण वेताळ साहेब यांचा उपस्थितीत दिप प्रज्वलन व छ.शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री मा.प्रमोद सावंत म्हणाले की,सर्व संपादक व पत्रकार यांच्या विविध मागण्या मी स्वतः भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांच्या कडे पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न तातडीने करणार आहे.
या नंतर समाज कल्याण मंत्री मा.सुभाष देसाई साहेब म्हणाले की, सदर संघटना हि आता सात राज्यात पसरली असून,लवकरच तिचे रूप संपूर्ण भारतात पसरलेले दिसेल.या नंतर डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणाले की,पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ असून,तो खूप मोठे काम करू शकतो.त्या अनुषंगाने त्यांनी अनेक माजी संपादक व पत्रकारांच्या प्रेरणा कथा सांगितल्या.या नंतर मा.रामकृष्ण वेताळ साहेब म्हणाले की,या संघटनेच्या सर्व मागण्या रास्त असून,प्रसार माध्यमांत कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी गोवा राज्यासारखे धोरण सर्व देशात सुरू झाले पाहिजे.यावेळी गोवा प्रदेश अध्यक्ष अनिल पाटील यांनी संघटने विषयी मनोगत व्यक्त केले.संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रसार माध्यमांची धार सांगून ,शासन दरबारी सर्व मागण्या लवकरच मान्य होतील ,अशी आशा व्यक्त केली.
दु.3 वा.दुसरे सत्र सुरू झाले या मध्ये पणजी चे खासदार मा.सदानंद शेठ तानवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,आज प्रसार माध्यमाचे रूप बदलले असून,ते तंत्र स्नेही झाली आहे.त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत.महाराष्ट्र राज्याचे उद्योग  मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब यांची मा.राजा माने यांनी घेतलेली प्रकट मुलाखत पार  पडली .यावेळी त्यांनी सांगितले की,प्रसार माध्यमातील काम करण्याऱ्या व्यक्तींच्या जशा मागण्या आहेत.त्या प्रमाणे त्यांनी आपले प्रामाणिक काम करत प्रसार माध्यमाचे पावित्र्य राखले पाहिजे.एकंदरीत वरील सर्व मान्यवरांचे म्हणणे एकच आले की,सत्याची कास धरून,प्रामाणिकपणे पत्रकारितेचा उपयोग हा समाज सुधारणे साठी झाला पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने प्रसार माध्यमांविषयी समाजात विश्वासार्हता वाढेल.



यावेळी सर्व उपस्थित मान्यवर यांचा यथोचित सत्कार शाल, बुके व सन्मान चिन्ह देवून मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला.यावेळी समाज क्षेत्रात काम करणाऱ्या,गोव्याचे गो संवर्धक श्री. कमलाकांत तारी,समुद्र संशोधक शास्त्रज्ञ सौ. महुआ साहा,योग प्रसारक कमलेश बांदेकर,उत्कृष्ठ प्रशासक दिपक नार्वेकर,दिव्यांग आयुक्त गुरू प्रसाद पावसकर,सामाजिक कार्यकर्त्या नेहा आंग्रे गावस, कवयित्री साहित्यिक सौ.चित्रा क्षीरसागर,मुंबईचे कृषी तज्ञ प्रकाश कुलकर्णी,सातारा चे सामाजिक कार्यकर्ते  माणिक शेडगे,पालघर चे ग्रामसेवा कार्यकर्ते निलेश सांबरे,बार्शी चे लोक व्याख्यानकार प्रा.विशाल गरड, वडवणी, बीडच्या आदर्श सरपंच सौ. राधा खताळ, बीड चे अनाथ व्यक्ती संगोपक गोवर्धन दराडे,बार्शी चे उद्योजक समाजसेवक संतोष ठोंबरे,नागपूर चे गो सेवक पद्मेश गुप्ता,मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते राकेश अग्रवाल,बाल मदतनीस राजेंद्र पाठक,आरोग्य सेवक विकास देशमुख,जल संधारण व ग्राम विकास मध्ये काम करणारी नागझरी, ता.सातारा येथील ग्राम विकास संस्था पदाधिकारी यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या परिसंवादात वक्ते पंढरपूरचे ॲड. संदिप कायदे,सावंतवाडीचे ॲड.नकुल पार्सेकर,पुण्याचे सौमित्र देसाई,गोव्याचे संजय ढवळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साताऱ्याचे विकास भोसले व संतोष शिराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. स.सर्व उपस्थितांना नाष्टा,चहा तसेच दुपारी जेवण, संध्याकाळी चहापान देण्यात आले.या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडला.यावेळी सर्व जाहिरातदार हितचिंतक याचे ऋणनिर्देश करण्यात आले.सर्व उपस्थित मान्यवर यांची निवासाची उत्तम व्यवस्था संघटने तर्फे बांबोली येथील सिंक एक्झिक्युटिव्ह थ्री स्टार हॉटेल मध्ये करण्यात आली होती.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ निवेदन फल्ले मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रम सर्व राज्यातील पदाधिकारी संपादक,पत्रकार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे यशस्वी करण्यात येवून,पुढील चौथे अधिवेशन दिल्ली येथे करण्याचा महासंकल्प करण्यात आला.

Comments