चलो तारळी धरण,,,चलो तारळी धरण,,,चलो तारळी धरण,,तारळी पंप स्टोरेज प्रकल्प बंद पाडण्याचे आंदोलन सोमवार दिनांक ११ मे 2026 , डॉ भारत पाटणकर,,,,
चलो तारळी धरण,,,चलो तारळी धरण,,,चलो तारळी धरण,,तारळी पंप स्टोरेज प्रकल्प बंद पाडण्याचे आंदोलन सोमवार दिनांक ११ मे 2026 , डॉ भारत पाटणकर.
उंब्रज, दि - ०७ प्रतिनिधी'
तारळी धरण येथील अदानी पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्प बंद पाडण्याचे आंदोलन सोमवार दिनांक ११ मे रोजी सकाळी 11 वाजता तारळी धरण येथे होणार असून त्याप्रमाणे बाधित होणाऱ्या गावांनी व लाभक्षेत्रातील गावांनी बदल लक्षात घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अदानी- तारळी पंप स्टोरेज प्रकल्प विरोधी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सदस्य बाळासाहेब सपकाळ,प्रदीप निकम यांनी केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तारळी धरण राज्यातील महसुली उत्पादनातून बांधले आहे तारळी पाणलोट क्षेत्रातील बाधीतांचे पुनर्वसन याच भागात झाले आहे तारळी धरण प्रकल्प मूळ पाणी वाटप आराखडा मंजूरी नुसार प्रत्यक्ष मूळ आराखड्यातील लाभधारकाना पाणी पोहोच झाले नाही अशा परिस्थितीत नवीन पंप स्टोरेज प्रकल्प उभारणी करूंन आपल्या वर अन्याय विरोधात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून तारळी धरण पंप स्टोरेज प्रकल्प बंद पाडू ,तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात स्थानिक बाधित होणाऱ्या जनतेला किंवा लाभक्षेत्रातील जनतेला कोणतीही माहिती न देता, लाभक्षेत्रातील सिंचनासाठी पाणी कमी पडत असताना, अजूनही काही लाभक्षेत्रातील गावांना पाणी देणे बाकी असताना या पंप स्टोरेज प्रकल्पाला पाणी देण्याचा घाट घातला आहे. यामुळे लाभक्षेत्र कमी होणार आहे.
या तारळी धरणाचे पाणी पाटण, कराड, खटाव व माण तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जाते, या प्रकल्पामुळे यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या कामामुळे धरणामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साठून पाणी साठा कमी होणार आहे. बोगद्याच्या कामासाठी ब्लास्टिंग केल्यामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे, तसेच या प्रकल्पामुळे बाधित गावातील, शेती, पाणी, जाऊन भूस्खलन सारखा धोका होणार आहे. त्याचबरोबर या सर्व भागात वन्यजीव यांचा असणारा वावर यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे,
यामुळे हा प्रकल्प हा या ठिकाणाहून रद्द करावा, यासाठी हे आंदोलन होणार आहे. जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन या समितीने केले आहे.
.jpg)


Comments
Post a Comment