सन 2026-27 गळीत हंगामासाठी 'सह्याद्रि'चा मिल रोलर पूजन समारंभ गुरूपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न
सन 2026-27 गळीत हंगामासाठी 'सह्याद्रि'चा मिल रोलर पूजन समारंभ गुरूपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न
मसूर दि २२ ;- रवी वाकडे
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026-27 गळीत हंगामासाठी गुरूपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्तावर मिल रोलर पूजन समारंभ राज्याचे माजी सहकार पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन माननीय श्री कांतीलाल भोसले-पाटील आणि विद्यमान संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी संचालक राजेंद्र पाटील (पार्ले), सुनील जगदाळे (शिरवडे), संजय गोरे (पाल), संतोष घार्गे (वडगांव ज.स्वा.) आणि संजय कुंभार (नांदगांव) यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व रोलर पुजन करण्यात आले.येत्या सन 2026-27 गळीत हंगामासाठी मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे गतीने सुरू आहेत. यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडे 23,000 हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद गळीतासाठी झालेली आहे. कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक ती ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे, प्रतिदिन 11000 व त्याहीपेक्षा जास्त ऊस गळीत करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी, त्यांनी पिकविलेला व कारखान्याकडे नोंदविलेला सर्व ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतासाठी पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक जशराज पाटील (बाबा), रमेश माने, जयंत जाधव, राजेंद्र चव्हाण, अरविंद जाधव, राहूल निकम, नेताजी चव्हाण, विजय निकम, आण्णासो पाटील, संभाजी साळवे, दिनकर शिरतोडे, दिपक लादे, संचालिका सौ. सिंधुताई पवार, कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे तसेच उत्तमराव मोरे, तुषार पवार, गजानन देशमुख, भानुदास जाधव, उत्तम चव्हाण (मेंबर), सुहास कदम, अशोकराव नलवडे, मोहन नलवडे, अर्जुन नलवडे (बुवा), महेश नलवडे, संभाजी नलवडे, दिनकर नलवडे, महेश पाटील, रवींद्र देशमुख, चंद्रकांत संकपाळ, बबन काळभोर, युवराज गोरे, शशिकांत माळी, अशोक माळी, निवास साळवे, आनंदा संकपाळ, प्रकाश माळी, पोपट कंबिरे, मधुकर धस, प्रकाश निकम, अमृत निकम, शिवाजीराव निकम, सुधाकर जाधव (आबा), चंद्रकांत निकम, धोंडीराम बर्गे, धीरज थोरात, अशोक पवार, विठ्ठल सुळे, नंदकुमार जाधव, रामचंद्र जाधव, सौ.नीलम नंदकुमार पवार, जयवंत पवार, वैभव पवार, विवेकानंद कुलकर्णी, दिलीप चव्हाण (दादा), शिवाजी शिंदे, संतोष भोसले, भरत माने, राजाराम माने, दादासो निकम आदी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ - मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील, व्हॉइस चेअरमन कांतीलाल पाटील, सर्व संचालक सभासद व अधिकारी.



Comments
Post a Comment