हायड्रोफोबीनम 200 या औषधाला ' रेबीज प्रतिबंधक औषध म्हणून मान्यता मिळावी.अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.नरहरी झिरवाळ यांच्या कडे लेखी मागणी.


हायड्रोफोबीनम 200 या औषधाला ' रेबीज प्रतिबंधक औषध म्हणून मान्यता मिळावी.
अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.नरहरी झिरवाळ यांच्या कडे लेखी मागणी.

सातारा, दि.7- प्रा.अजय शेटे.
भटक्या कुत्र्यांचा  नागरिकांना होणारा त्रास आणि त्यांचे अंगावर येवून भुंकणे तसेच चावणे हा आज सर्वांच्या काळजीचा विषय बनला आहे.अशा कुत्र्यांच्या चावण्या मुळे सर्वसामान्य व्यक्तीस रेबीज नावाचा अतिशय घातक असा जीवघेणा आजार उद्भवू शकतो. कुत्र्यांच्या लाळे मध्ये हे रेबीज चे घातक विषाणू असतात.अशा वेळी रुग्ण व नातेवाईक यांच्या दृष्टीने हा कालखंड अतिशय काळजीचा असतो.
कुत्र्यांच्या चाव्याची तीव्रता तज्ञ डॉक्टर यांच्याकडे तातडीने जावून करावी लागते व योग्य ते औषधोपचार वेळेत सुरू करावे लागतात.काही वेळा रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसणे, तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसणे,वेळेत औषधोपचाराला जाणे न जमणे,दुर्लक्ष करणे,आर्थिक स्थिती नसणे म्हणून अनेक प्रकारे उपचार घेणे टाळले जाते.अथवा भिती वाटणे ,बरोबर जबाबदार व्यक्ती नसणे.अशा एक ना अनेक कारणाने उपचार घेणे टाळले जातात किंवा काही स्थानिक वैद्यांकडून गावठी उपचार करून,वेळ मारून नेली जाते.
परंतु कालांतराने त्याचे दुष्परिणाम दिसून येतात आणि रेबीज लागण युक्त व्यक्ती विचित्र शारीरिक हालचाल व हावभाव करू लागते.तिचे वर्तन  पशू समान बनते, ती दुसऱ्या व्यक्तीचा चावा घेण्याचा प्रयत्न करते ,तिला पाण्याची भिती वाटू लागते. ती पाणी ग्रहण करत नाही.अशा अनेक दृश्य व ऐकीव कथा समाजात आपणास ऐकण्यास मिळतात. मग अशा व्यक्तीवर उपचार करणे अथवा तिचा बंदोबस्त करणे हे सर्व यंत्रणेला मोठे जिकिरीचे ठरते.

तेव्हा अशा व्यक्तीस सर्वात तातडीने योग्य  प्राथमिक उपचार करण्यासाठी होमिओपॅथी औषध पद्धतीत हायड्रोफोबीनम 200 हे औषध अतिशय प्रभावी व परिणाम कारक ठरते ,अशी माहिती आर्य होमिओ फार्मा चे संचालक डॉ.गिरीश जोशी यांनी सांगितले की,हे औषध गोळ्यांची डबी या स्वरूपात व  माफक किमतीत  सहज उपलब्ध होते.सलग आठ दिवस सकाळी ,दुपारी,संध्याकाळी अशा प्रत्येकी चार म्हणजेच दिवसभरात एकूण बारा गोळ्या रुग्ण व्यक्तीस खाव्या लागतात.अर्थात आठ दिवसात एकूण शहाण्णव गोळ्या खाऊन,कोर्स पूर्ण करावा लागतो.त्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
म्हणून या औषधाला शासकीय पातळीवर रेबीज विरोधी औषध म्हणून त्वरित योग्य ते संशोधन करून शासकीय मान्यता मिळावी या आशयाचे एक हजार सह्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.नरहरी झिरवाळ साहेब यांना नुकतेच रवाना करण्यात आले आहे. सदर मान्यता मिळाल्यास सदर औषध हे ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टर अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत आरोग्य विभाग अथवा गावात,वाडी वस्तीवर  सहजासहजी उपलब्ध होईल अशा दोन ठिकाणी अथवा वैयक्तिक स्वरूपात स्वतःच्या घरात सुद्धा ठेवणे फायदेशीर होणार आहे.तसेच सदर औषध घेण्याची पद्धत अतिशय सोपी असून, सुलभ पद्धतीने व्यक्ती उपचार घेवू शकते.
'रेबीज ' हा आजार हा कुत्रे,मांजर,उंदीर, घुस, माकड इत्यादी अशा अनेक उपद्रवी प्राण्यांच्या चाव्याने उद्भवू शकतो.तेव्हा हे औषध शासकीय पातळीवर योग्य ते संशोधन होऊन तातडीने लागू व्हावे.असे सर्वसामान्य व्यक्तींची मागणी आहे.
अशा प्राण्यांच्या उपद्रवापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित काळजी घेवून रहावे.परिसर स्वच्छ ठेवावा,प्रतिबंधक औषधे वापरून नायनाट करावा.तसेच त्यांच्या  नैसर्गिक मिलन प्रक्रियेत अडथळा आणू नये.त्यांना दगड अथवा काठीने मारहाण करून जबरदस्तीने सोडविण्याचा प्रयत्न करू नये. लहान मुलांना अशा अघोरी  कृत्यापासून मोठ्या व्यक्तींनी रोखावे.जेणेकरून त्यांच्या अवयवांना मोठी दुखापत होणार नाही व त्यांना अपंगत्व अथवा अकाल मृत्यू येणार नाही.अथवा अशी जनावरे सैरभैर होऊन ती  अचानक कोणाचा  तरी चावा घेवून रेबीज विषाणूचा प्रसार करणार नाहीत अशी काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे.असे तज्ञ जाणकार व्यक्तीच्या विचारातून समजून येत आहे.
या आधीही  'नाजा 200 ' या औषधाला सर्पदंश विरोधी प्राथमिक लस उपचार म्हणून मान्यता मिळावी.अशी मागणी करण्यात आली असून,त्याची संशोधंत्मक माहिती घेवून कार्यवाही सुरू होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

Comments