वडूज शिक्षण विकास मंडळ अंतर्गत 'संस्था आपल्या दारी ' उपक्रम ई.10 वी व 12 वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ संपन्न.

 


वडूज शिक्षण विकास मंडळ अंतर्गत  'संस्था आपल्या दारी ' उपक्रम ई.10 वी व 12 वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ संपन्न.

           

सातारा, दि.20- प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित,हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सन 2025.26 च्या ई.10 वी मधील प्रथम सर्व  गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा नुकताच रविवार दि.17 रोजी स.10 वा.पासून ' संस्था आपल्या दारी ' उपक्रमांतर्गत विद्यार्थांच्या घरी जाऊन व त्यांचा यथोचित सन्मान करून साजरा करण्यात आला.
                                      

यामध्ये ई.10 व 12 वी मधील  प्रथम काही क्रमांकाच्या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा विशेष गुण गौरव करण्यात येवून,त्यांच्या भावी शैक्षणीक आयुष्यासाठी शुभचिंतन व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम यांच्या सह संस्था चेअरमन गोविंद भंडारे, उपाध्यक्ष विजय म्हामणे, सचिव सचिन काळे,संचालक सुभाष येवले,अशोक भंडारे, गजानन शेटे,संजय येवले ,नितीन जाधव यांनी संस्थेच्या वतीने गुणी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पेढे देवून सत्कार केला.
यावेळी त्यांच्या समवेत पर्यवेक्षिका सौ.एस. पी.जोशी,वरिष्ठ शिक्षक एस.एस.जामदार, ए. एम.राऊत, डी.एम.लहारे यांनी सहभाग नोंदवून संस्थे सह शिक्षकांच्या वतीने पण गुणगौरव केला.



यावेळी प्राचार्या सौ. बी.एस.माने मॅडम म्हणाल्या की,आमच्या हुतात्मा शाळा संकुलात कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान पातळीवर प्रवेश दिला जातो.तसेच जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्यात उच्चतम गुणवत्ता निर्माण करण्याचे कार्य आमची संस्था व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी करत असतात.आणि याचेच अतिशय उत्तम फळ म्हणजे आजचा हा विशेष गुणगौरव समारंभ इथे विद्यार्थांच्या घरी जाऊन पार पडताना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला आहे.

                   
या उपक्रमामुळे पालक वर्ग व गुणी विद्यार्थी यांच्या गुणांचे खरे यथोचित कौतुक झाल्यामुळे सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार झाले होते.







Comments