'सार्वजनिक सत्य धर्म
पुस्तक' हा फुले यांचा शेवटच
ग्रंथ ठरला. तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते. 'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन
साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या
तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी तत्त्वज्ञाना ने निर्माण केलेल्या शोषण
व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग
दाखवण्यासाठीच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि या
सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका'ची निर्मिती झाली आहे.
डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात की , "सार्वजनिक सत्य धर्म ' हे पुस्तक म्हणजे
सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर
एकूण माणसाला सुखाकडे नेणारा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या
मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच
नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे."
त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक असाच आहे.
रा. ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात ' सार्वजनिक सत्यधर्म ' या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून ,दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता कशी असावी ? याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला.
एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्ममय लिहिले आहे. त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण केले गेले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता ठरली होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे.
जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी
त्याना मुंबईतील सभेत सन १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे
"महात्मा फुले" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही साहित्य प्रकार पुस्तके व त्यांचा लेखनकाळ
पुढील प्रमाणे आहे.इ.स.१८५५ मध्ये त्यांनी ' तृतीय रत्न ' हे नाटक लिहिले.
जून, इ.स. १८६९ मध्ये छ.शिवाजीराजे भोसले महाराज यांचा पोवाडा,जून इ.स. १८६९ विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी यांचा पोवाडा,
इ.स.१८६९ ' ब्राह्मणांचे कसब ' हे पुस्तक,
इ.स.१८७३ ' हा ग्रंथ
२४
सप्टेंबर,१८७६ रोजी सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची
हकीकत हा व 20 मार्च १८७७ ची बैठक हे
अहवाल लेखन केले. पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट,
१२ एप्रिल १८८९ मध्ये पुणे सत्यशोधक समाजाचा
निबंध व वक्तृत्व समारंभ अहवाल,
२४ मे इ.स. १८७७ मध्ये दुष्काळविषयक पत्रक,
१९ ऑक्टोबर,१८८२
हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन,
१८ जुलै ,१८८३ 'शेतकऱ्याचा असूड ' हा ग्रंथ,
४ डिसेंबर १८८४मध्ये महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन
टिपणांविषयीचे मत निबंध म्हणून लेखन,
११ जून,१८८५ ,मराठी ग्रंथागार सभेस पत्रलेखन,
१३ जून १८८५ 'सत्सार अंक १ पुस्तक,
ऑक्टोंबर ,१८८५
सत्सार अंक २ पुस्तक,
१ ऑक्टोंबर ,१८८५ ,' इशारा ' पुस्तक,
२९ मार्च ,१८८६, ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर प्रकटन,
२ जून ,१८८६ मामा परमानंद यांस पत्रलेखन,
जून १८८७ मध्ये
सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी पुस्तक,
इ.स. १८८७ , अखंडादी काव्य रचना,
१० जुलै ,१८८७ मृत्युपत्र अर्थात महात्मा फुले यांचे
उईलपत्र,
इ.स. १८९१ ,प्रकाशन सुरू करून,सार्वजनिक सत्यधर्म
पुस्तक ग्रंथ हे आहेत.त्यांच्या
जीवनक्रमातील अनुक्रमे
दिनांक ,महिना व इ.स. नुसार घटना पुढील प्रमाणे आहेत. ११ एप्रील १८२७ मध्ये जन्म कटगुण, खटाव,सातारा येथे जन्म, इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.इ.स. १८४० नायगावच्याच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक इंग्रजी शिक्षण. इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार अंगिकार,इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन. इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान, इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१६ नोव्हेंबर,१८५२ मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण
कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१५ इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन
समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.१७,सप्टेंबर १८५१ ,भिडे वाड्यात व रास्ता
पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.
१५ मार्च १८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू
केली.
१६नोव्हेंबर ,१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक
कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
सन १८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार
मांग अँड अदर्स' हि संघटना स्थापन केली. इ.स.१८५४ स्कॉटिश
मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी. इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात
केली.इ.स.१८५६ जोतिबांवर 'मारेकरी घालून हत्येचा
प्रयत्न ' झाला.
इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स.१८६० विधवाविवाहास सहाय्य केले.
इ.स.१८६३ बालहत्या
प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा
संप घडवून आणला.
इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. इ.स.१८६८
मध्ये दुष्काळ काळात राहत्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ. स. १९६९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लेखन
केले.जून १९६९ 'शिक्षण विभागाचे ब्राह्मण
पंतोजी' रचना
,इ. स. १९६९ 'ब्राह्मणाचे कसब' या पुस्तकाचे लेखन,१३ ऑगस्ट इ. स. १९६९
भगवान परशुराम याला नोटीस लेखन, इ. स. १८७३ ' गुलामगिरी' ग्रंथ,
२४ सप्टेंबर ,१८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
इ.स.१८७५ शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध ' खतफोडीचे बंड '
अहमद नगर येथे घडवून आणले .इ.स. १८७५ स्वामी दयानंद
सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर
पालिकेचे सदस्य म्हणून कार्य, इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध
केला.इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार
संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले. इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. इ.स.१८८७ सत्यशोधक
समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह
घडवून आणण्यास सुरुवात केली.इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
११ मे १८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर
विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
नोव्हेंबर २८ ,१८९० पुणे येथे निधन झाले. अशा एकूण 43 घटनांमधून म.फुलेंचे
समग्र जीवन कार्य महाराष्ट्र भूमीवर अवतरले. पुढे
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात
रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू
महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. या चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने
अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
त्यांच्या ' तृतीय रत्न ' या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे.
जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू
जोतिबा लिहितात, ‘सवर्ण आपल्या मतलबी थापा
देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती
धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर
आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या
एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले. परंतु
तेथेही असल्या भिडस्त सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना.
तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर
दुसरी लहानशी कसबाविषयी नवीन चोपडी तयार
करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली." इ.स. १८९१ च्या पूर्वी
या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा
उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या
अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना
बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित
प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना
आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ म्हणजेच
तब्बल १२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच
आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी
नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून
असे मानले जाई. पण तृतीय रत्न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या
नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.असे
म्हणणे रास्त ठरते.
आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर
करण्याचा त्यांचा हेतू होता.
नाटकाचे स्वरूप पाहता , या नाटकाला रूढ कथानक
नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक
अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची
संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च
असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत
असतो, नागवित असतो याचेच
प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.
नाटक म्हणून तृतीय रत्नचे लेखन सलग झालेले असून, ती अनेक प्रवेशांची
मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच
वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला 'मुक्तनाट्य किंवा वगनाट्य
' म्हणजेच ओघ,असा कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.या
प्रमाणे सादरीकरण म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी
लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्नची आहे. ठराविक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज
नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला
विशेष महत्त्व आहे.
या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या
संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्न (किंवा त्रितीय
नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी
परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे
फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्न
जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.
हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही
प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा
जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून
दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत
असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब
कसब व्यक्त होते.
महात्मा फुले लिखित ऐतिहासिक 'तृतीय रत्न' हे नाटक 2015 साली पुण्यामधून दिग्दर्शक
सिद्धार्थ सिताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली. यातील विदूषकाची भूमिका ते
स्वतः करत होते. तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या.
या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते. काही कारणास्तव कांबळे साहेब
यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी स्वतःच्या
खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले. म.
फुलेंवर लिहिलेली पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.
असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
क्रांतिजागर : महात्मा फुले यांची समग्र कविता (डॉ. रवींद्र
ठाकूर)
क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य
रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
गोष्टीरूप महात्मा फुले (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक :
बा.ग. पवार
भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले (ना.ग.
पवार)
महात्मा (मराठीत आणि इंग्रजीत, डॉ. रवींद्र ठाकूर)
महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर
महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका
: अनुराधा गद्रे
महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित)
प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक :
विठ्ठलराव भागवत
महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन
साहित्य
महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन :
नागनाथ कोतापल्ले
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम
पाटील
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन
विभूते ; मनोविकास प्रकाशन
महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर
लक्ष्मण भोळे
महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे)
महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा
प्रकाशन
महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे
महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय
विचार साधना प्रकाशन पुणे
महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
महात्मा फुले दुर्मिळ वाङ्मय आणि समकालीन चरित्रे. लेखक :
मा.गो. माळी
महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक :
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक :
श्री गजानन बुक डेपो
महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक :
विद्याकर वासुदेव भिडे
महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक :
हरिभाऊ पगारे
महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार
महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक :
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी.
कुलकर्णी
युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील
चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर)
महात्मा जोतीराव फुले - नजरीयात और ऊन का अदब.सरसरी जायजा,(ऊर्दू) लेखिका -
डाॅ.नसरीन रमझान सैय्यद (पुणे)
महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध -- संपादक ..प्रा.डॉ.
नरसिंग कदम ( उदगीर )
महात्मा फुले : साहित्य आणि विचार संपादक प्रा.डॉ. नरसिंग
अप्पासाहेब कदम
फुलेंवरील नाटके व चित्रपट
महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य
अत्रे.
महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव खरात,मी जोतीबा फुले बोलतोय
(एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी
महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार’ दिला आहे.
सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे
जोती सावित्री ( मराठी ऐतिहासिक नाटक ) लेखक व निर्माते :
मंगेश एस.पवार,कविता मोरवणकर,दिग्दर्शक : प्रमोद
सुर्वे
सावित्रीजोती ही फुले दांपत्यावरील मालिका सोनी मराठी
वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत होती. ही मालिका दशमी क्रिएशनची
निर्मिती होती. सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार यांनी
साकारली होती, तर जोतीराव फुले यांची
भूमिका ओंकार गोवर्धन यांनी केली होती. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे
असून नितीन वैद्य यांची निर्मिती होती.
३ डिसेंबर २००३ रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे तत्कालीन
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
फुले दांपत्याचा पुतळा औरंगाबाद येथे आहे.
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर
आधारित, नाटक "मी जोतीराव
फुले बोलतोय ..!"याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे
लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच
महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली
आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत.
हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण
देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व
रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती
महोत्सव साजरा करते.
जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे
यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला
होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी
लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले
प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर
राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य
संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक
संस्था महाराष्ट्रात आहेत.अशा या महान समाज सुधारक व नेत्यास विनम्र अभिवादन


.jpg)


Comments
Post a Comment