
कन्या विद्यालय उंब्रज ची माजी विद्यार्थिनी कुमारी समृद्धी प्रविण इंगळे हिची एनडीए साठी निवड.
उंब्रज दि २७ :- रवी वाकडे
कन्या विद्यालय उंब्रज ची माजी विद्यार्थिनी कुमारी समृद्धी प्रविण इंगळे हिची एनडीए साठी निवड. रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणी बाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज येथील माजी विद्यार्थिनी कुमारी समृद्धी प्रविण इंगळे याची राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (N.D.A.)साठी निवड झाली आहे तिच्या या यशामुळे शाळा व परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे सन 2023 -24 मधून तिने कन्या विद्यालयातून 99% गुण मिळवून यश संपादन केले होते. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उंब्रज येथून झाले.
तिने माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज येथून घेतले अकरावी बारावी शिक्षणासाठी सैनिकी सेवापुर्व प्रशिक्षण केंद्र- नाशिक येथे तिने पूर्ण केले. त्यामध्ये ऑल इंडिया रँक मध्ये ती 15 वी आली व महाराष्ट्रातून ती 2री आली आहे.
समृद्धीने शालेय जीवनात अभ्यासाबरोबर विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. तिच्या चिकाटी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने हे यश संपादन केले यावेळी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. पाटील सुनीता रतन व स्कूल कमिटी ने तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला त्यावेळी विद्यालयातील स्कूल कमिटी सदस्य माननीय श्री सुरेशराव साळुंखे माननीय श्री संजय पाटील व माननीय श्री अजित जाधव,पत्रकार रवींद्र वाकडे हे उपस्थित होते.
त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या समृद्धीच्या या यशामुळे इतर विद्यार्थिनींना ही प्रेरणा मिळणार असून देश सेवेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिचे पाऊल आदर्श ठरणार आहे तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही तिचा सत्कार झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुल विभाग प्रमुख श्री.मिरजगाव के. एम. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कलाशिक्षक श्री कुंभार एस.जी.यांनी मानले.



Comments
Post a Comment