छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर जनजागृती अभियान उंब्रज येथे उत्साहात संपन्न.
सातारा दि ११ :- रवींद्र वाकडे
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान जनजागृती शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत महसूल सेवा पंधरवडा चे आयोजन उंब्रज येथे पार पडदे शासकीय विविध दाखले या शिबिरामध्ये देण्यात आले तसेच गावठाण विकास चे नकाशेही यावेळी संबंधित गावांना दिले गेले त्याचबरोबर या विभागातील गावांतर्गत असणाऱ्या समस्या बाबत ही सखोल चर्चा करण्यात आली व त्या सोडवण्याची आश्वासनही आमदार घोरपडे यांच्याकडून देण्यात आले.
आमदार मनोज दादा घोरपडे यांनी उंब्रज येथे अभियान आयोजित करून ग्रामस्थांना शासकीय योजनांबाबत माहिती करून दिली त्याबद्दल आमदार घोरपडे यांचे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव यांनी आभार मानले या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आमदार मनोज दादा घोरपडे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव तसेच शासकीय पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment