म.बसवेश्वर पतपेढीच्या सल्लागार पदी प्रकाश मुसळे.
सातारा, दि.20 -रविंद्र वाकडे.
म.बसवेश्वर पतपेढीच्या सल्लागार पदी प्रकाश मुसळे. म.बसवेश्वर सहकारी पतपेढी , शिवडे, ता.कराड, जि.सातारा या संस्थेच्या तज्ञ सल्लागार पदी श्री.प्रकाश मारुती मुसळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र नुकतेच चेअरमन प्रमोद देशमाने यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.या वेळी संचालक कांतिलाल जगताळे , सूर्यकांत मैत्री,संजय देशमाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री.प्रकाश मुसळे हे उंब्रज येथील वृत्तपत्र विक्रेते श्री.प्रभाकर मुसळे यांचे बंधू आहेत.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.


Comments
Post a Comment