घुटे यांच्या दुकानासमोरील भुयारी मार्ग बनला मृत्यूचा सापळा,प्रशासन आणि रस्ते महामंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष???????

उंब्रज दि :- २४ रवींद्र वाकडे
घुटे यांच्या दुकानासमोरील भुयारी मार्ग बनला मृत्यूचा सापळा,प्रशासन आणि रस्ते महामंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष??????? उंब्रज मधील प्रसिद्ध व्यापारी आणि बाजारपेठेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घुटे यांच्या दुकानासमोर भुयारी मार्ग आहे विशेषतःउंब्रज मधील नागरिक वाहतुकीसाठी वापरतात पण सध्या हा भुयारी मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे .अरुंद रस्ता तुटलेली गटार आणि भुयारी मार्गात बसणारे छोटे व्यापारी यांच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे आज दुपारच्या सुमारास बोगद्यातून येणारी बोलेरो आणि दुचाकी यांच्या कोंडीमुळे सदरची गाडी ही अपघात होता होता वाचली आहे.
ग्रामस्थांनी वेळेस मदत केली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला अपघात वाचला ग्रामस्थांनी वेळेत मदत केली त्यामुळे मोठा अपघात टळला ग्रामपंचायत आणि रस्ते महामंडळ यांनी ताबडतोब या ठिकाणी होणारी गैरसोय दूर करावी आणि पोलीस प्रशासन यांनी या बोगद्यातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करून फक्त दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून सध्या जोर धरू लागली आहे.


Comments
Post a Comment