श्री.जितेंद्र बाजारे यांची इन्वेंशन इनोवेशन अँड इनक्युबेशन संस्थेच्या सल्लागार पदी निवड.

 


श्री.जितेंद्र बाजारे यांची इन्वेंशन इनोवेशन अँड इनक्युबेशन संस्थेच्या सल्लागार पदी निवड.

                 

सातारा, दि.25 - रविंद्र वाकडे

                             श्री.जितेंद्र बाजारे यांची इन्वेंशन इनोवेशन अँड इनक्युबेशन संस्थेच्या सल्लागार पदी निवड.   रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.आय.ए.एस.अधिकारी मा.चंद्रकांत दळवी साहेबांच्या व देशाचे नेते,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार  मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या सी . आय.आय.आय. इनवेंशन इनोवेशन अँड इनक्युबेशन या संस्थेच्या सातारा,पुणे,खारघर या शाखेसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.जितेंद्र बाजारे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.माझ्या आयुष्यातील हा दिवस सर्वोत्तम आनंदाचा आहेत.

                    

ज्या संस्थेत मी शिकलो,त्याच संस्थेच्या उच्च विभागाचा सल्लागार म्हणून काम करण्याची संधी दस्तूरखुद्द आदरणीय चेअरमन चंद्रकांत दळवी साहेबानी मला दिली .त्याबद्दल मी रयत शिक्षण संस्था,सर्व अधिकारी-पदाधिकारी सचिव,सह सचिव,सी.ई.ओ,व सर्व स्टाफ यांचा मनापासून आभारी आहे. मी या पदाला न्याय देण्याचा व आपण दिलेल्या संधीचा उद्देश साध्य करण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करेन.असे त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments