
वडूज मध्ये म.बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
सातारा, दि.20 -प्रा.अजय शेटे.
म.बसवेश्वर महाराज यांची जयंती , वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी स.9.30 वा.श्री हनुमान मंदिर, वडूज येथे म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.बालाजी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.बसवेश्वर येवले यांच्या हस्ते करण्यात येवून पूजा,आरती करण्यात आली.या वेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
या नंतर वडूज नगर पंचायत तर्फे म.बसवेश्वर जयंती शासकीय कार्यक्रम नगर पंचायत सभा दालनात साजरा करण्यात आला.या वेळी म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन उप नगराध्यक्ष जयवंत पाटील,नगर सेवक सचिन माळी,अभय देशमुख, काकासाहेब बनसोडे,तानाजी वायदंडे,राजेंद्र चव्हाण,रविंद्र काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी समाज पदाधिकारी कार्यकर्ते प्रदिप शेटे,प्रशांत शेटे,श्रीकांत म्हामणे, अविनाश तोडकर,संजय येवले,राहुल म्हामणे,राजेंद्र गाडवे, मिथिल शेटे,अमित गाडवे,सूरज म्हामणे, अधिक येवले,यश शेटे ,नितीन लंगडे,सोहम हिंगसे हजर होते.
यावेळी प्रा.अजय शेटे,नगरसेवक अभय देशमुख,तानाजी वायदंडे बापू यांनी म.बसवेश्वर यांच्या कार्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत अधीक्षक राजेंद्र काटकर,धनाजी कांबळे,सागर लंगडे यांनी विशेष परिश्रम घेवून , म.बसवेश्वर यांना स्टाफ तर्फे अभिवादन केले.
या नंतर संध्या.4 वा.शिव - दत्त भजनी मंडळ यांचे भजन,विश्व आराध्या महिला भजनी मंडळाचे लघुरुद्र पठण झाले. संध्या.6 वा.संपूर्ण शहरातून म बसवेश्वर यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी बेंजो वादन करण्यात येवून,फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.तसेच म बसवेश्वर महाराज की जय, वीरशैव लिंगायत धर्माचा विजय असो अशा घोषणा सर्व स्त्री - पुरुष,तरुण - तरुणी यांनी दिल्या.यावेळी सर्व घरासमोर सडा - रांगोळी घालण्यात येवून, म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून ,दर्शन घेण्यात आले.
त्या नंतर श्री मारुती मंदिर मध्ये आल्यानंतर प्रा.अजय शेटे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद करून, 'कल्याण क्रांती व शरण चळवळ ' या विषयी माहिती सांगितली. मा.सरपंच सोमनाथ येवले यांनी म.बसवेश्वर यांचे सामाजिक योगदान विषद केले.त्या नंतर प्रमुख अतिथी व जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा.एन.एस. उर्फ बंडा गोडसे सर् यांनी म.बसवेश्वर यांनी महिलांविषयी केलेल्या क्रांतिकारक कार्याची माहिती सांगितली.
या नंतर नूतन अध्यक्ष सूरज म्हामणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येवून , उद्योजक विकास किसनराव शेटे यांच्या तर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या नंतर नूतन पदाधिकारी अध्यक्ष सूरज म्हामणे, उपाध्यक्ष मिथिल शेटे, संकल्प देशमाने,सेक्रेटरी सागरशेठ येवले,विशाल टाकणे,खजिनदार ओंकार गाडवे, सदस्य राजेंद्र शेटे,सूरज ठिगळे,विशाल म्हामणे,सागर म्हामणे,अजिंक्य ठिगळे,अधिक येवले, साहिल शेटे,दिनेश शेटे,आलोक महाजन,सुरेश निलाखे यांचे अभिनंदन करण्यात येवून,सत्कार करण्यात आला.मार्गदर्शक म्हणून प्रमोद महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय बापू शेटे,विजय म्हामणे, सुनील शेटे, सुधीर म्हामणे,संकेत म्हामणे,अमोल म्हामणे, नितीन गाडवे,वैभव म्हामणे,प्रतीक शेटे,रेवण
म्हामणे , प्रवीण हिंगमिरे,जगदीश शेटे यांनी विशेष प्रयत्न केले.श्री.अशोक जोशी,सुयोग लंगडे,संजय आंबिके,मिलिंद लंगडे यांच्यासह
सर्व कार्यक्रमाला स्त्री - पुरुष समाज मंडळींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.व्यापारी,आदिशक्ती,शिवगर्जना,शिवदत्त मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.


Comments
Post a Comment