तासवडे एमआयडीसीतील स्फोट प्रकरणाला नवे वळण; अमोल सुभाष कांबळे च्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! अमोल कांबळे


 तासवडे एमआयडीसीतील स्फोट प्रकरणाला नवे वळण; अमोल सुभाष कांबळे च्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! अमोल सुभाष कांबळे


   उंब्रज दि  १५ :- रवींद्र वाकडे

तासवडे एमआयडीसीतील स्फोट प्रकरणाला नवे वळण; अमोल सुभाष कांबळे च्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! अमोल सुभाष कांबळे

तासवडे येथील 'मे. एस के एस फाईन केम' कंपनीत झालेला भीषण स्फोट हा केवळ अपघात नसून तो कंपनी प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एमआयडीसी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत 'विशेष तपास पथकाद्वारे' चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

३० मार्च २०२६ रोजी झालेल्या या भीषण स्फोटाने संपूर्ण कराड तालुका हादरला होता. या संदर्भात मनविसे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे यांनी उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत आणि सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्रमक मागणी केली होती. या निवेदनात त्यांनी धक्कादायक आरोप केले होते की:


१. कंपनीने ८ दिवसांपूर्वीच 'सेफ्टी ऑडिट' पूर्ण केले होते, तरीही हा स्फोट कसा झाला? हे ऑडिट केवळ कागदोपत्री होते का? २. कंपनीच्या आवारात बेकायदेशीर विहीर बुजवून त्यात घातक रसायनांचे ड्रम गाडल्याची शक्यता आहे.

३. या प्रकरणाच्या चौकशीत सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी करण्याची मागणी.

४. कंपनीवर गुन्हा दाखल करावा


                                          

अमोल कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेत, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे दोषी व्यवस्थापन आणि भ्रष्ट ऑडिटर्सचे धाबे दणाणले आहेत.

अमोल सुभाष कांबळे

जिल्हा सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, सातारा.

सोबत जोडलेली कागदपत्रे:

१. एमआयडीसीचे चौकशीचे आदेश पत्र.

२. मनविसेचे उद्योगमंत्र्यांना दिलेले मूळ निवेदन

Comments