आधुनिक भारताचे प्रकाश रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
सातारा दि १३ -प्रा.अजय शेटे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील ' महू ' या गावी झाला.हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ,महान राजकारणी व समाज सुधारक होते.त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली.अस्पृश्य लोकांबरोबर होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठी चळवळ उभारली.तसेच भारतातील महिला व कामगार यांच्या हक्कांचे समर्थन केले.इंग्रज कालीन भारताचे ते मजूर मंत्री व स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मानले जाते.त्यांनी भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवन केले. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे ' शिल्पकार व निर्माते ' मानले जाते.
डॉ.आंबेडकरानी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून ' अर्थशास्त्र ' या विषयात पी.एच.डी.पदवी प्राप्त केली.त्याच बरोबर कायदा व राज्यशास्त्र या विषयावर विशेष संशोधन केले.सुरुवातीला त्यांनी एक अर्थशास्त्रज्ञ,प्राध्यापक व वकील म्हणून कार्य केले.त्या नंतर समाजकारण व राजकारण या मध्येही काम केले.भारतीय स्वातंत्र्य प्रचार व चर्चा यामध्ये सामील झाले.अनेक वृत्तपत्रे प्रकाशित केले.दलित समाजासाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला,आणि एक महान प्रकाश रत्न बनून,आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.
सन 1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरण नंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. सन1990 मध्ये त्यांना भारतीय शासनाने ' भारत रत्न ' हि मरणोत्तर पदवी प्रदान केली. सन 2012 मध्ये ' द ग्रेटेस्ट इंडियन ' नावाच्या सर्वेक्षणात त्यांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड झाली आहे.महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह,पुणे करार ,सिद्धार्थ कॉलेज ची स्थापना अशा काही महत्वाच्या घटना त्यांच्या कार्याची प्रचिती देतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सन 1942 ते 46 मध्ये ब्रिटिश कालीन भारताचे मजूर ,ऊर्जा व बांधकाम मंत्री होते. 1946 ते 50 या कालखंडात संविधान सभेचे सदस्य होते. बंगाल व मुंबई प्रांताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन,रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षांची स्थापना केली.तसेच बहिष्कृत हितकारीणी सभा व समता सैनिक दल या सामाजिक संस्थांची स्थापना केली.
त्यांच्या आईचे नाव भीमा बाई,वडील रामजी,पत्नी रमाबाई व सविता व अपत्य यशवंत हे होत. त्यांच्या वडिलांनी काही काळ सातारा जिल्ह्यातील ,खटाव तालुक्यातील मायणी या ब्रिटिश कालीन तलावाचे मुकादम म्हणून कार्य केले होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका मधील ' आंबडवे ' हे होय.त्यांनी भारतीय बौद्ध धर्माची स्थापना केली. सर्वात जास्त पदव्या प्राप्त करणारे अतिशय उच्च विद्याविभूषित नेते म्हणून संपूर्ण भारत त्यांना ओळखतो. ग्रेज इन्, लंडन व बॉन विद्यापीठ,जर्मनी येथे पण त्यांचे उच्च शिक्षण झाले.त्यांना शिक्षण कार्यांत बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजे छ.शाहू महाराज यांचेही मोठे सहकार्य लाभले. 'प्रॉब्लेम ऑफ रुपी ' या त्यांच्या ग्रंथात भारतीय बँकिंग व्यवस्थेची बीजे रोवली आहेत.त्यांनी ' बुद्ध अँड हिज धम्म ' व्हू वेअर शुद्राज ' व इतर ग्रंथ लेखन केले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रतापसिंह हायस्कूल ,सातारा येथे झाले होते. त्यांच्या मते माणसाची ' काया-वाचा-मन ' शुद्धी झाली पाहिजे . त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर,1956 ला झाला.
त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन.




Comments
Post a Comment