तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची भाजपा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड.


तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची भाजपा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड
कराड दि 08 :-रवी वाकडे
तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची भाजपा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड
      सौ तेजस्विनीताई संग्राम घोरपडे यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले यांनी जाहीर केले. स्वाभिमानी महिला सखी मंचच्या कार्याध्यक्षा म्हणुन त्यानी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सौ. तेजस्विनीताई या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या भाऊजई व युवा उद्योजक युवा नेते संग्राम घोरपडे यांच्या पत्नी आहेत. 

       त्यानी स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून कराड उत्तर मध्ये जवळपास 25 हजार महिलांचे संघटन तयार केले आहे. त्या उच्चशिक्षित असल्याकारणाने भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला संधी मिळाल्याची भावना जिल्ह्यातून व्यक्त होत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सौ. तेजस्विनीताई घोरपडे यांनी संघटन केले आहे त्याचपद्धतीन भाजपच्या महिला संघटन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करता येईल म्हणून तेजस्विनी घोरपडे यांची निवड करण्यात आलेली आहे.
      या निवडीसाठी प्रदेश महिला अध्यक्ष चित्राताई वाघ यांचा विशेष आग्रह होता. या निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब, खासदार उदयनराजे भोसले, मा. मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा.मंत्री जयकुमार गोरे भाऊ, जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसले, आमदार मनोज दादा घोरपडे यांनी अभिनंदन केले असून संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
 चौकट= आज पर्यंत केवळ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काम केले असून इथून पुढे पक्ष वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जुन्या नवीन पदाधिकारी यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त पक्ष वाढ करण्यासाठी प्रयत्न प्रयत्नशील राहणार-
 तेजस्विनी संग्राम घोरपडे 
  भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सातारा

Comments