.उंब्रज चरेगाव रोड बनला गटार गंगा, रस्त्यावरील ड्रेनेजच्या पाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य.


उंब्रज चरेगाव रोड बनला गटार गंगा, रस्त्यावरील ड्रेनेजच्या पाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य.

उंब्रज दि 04 :-रवींद्र वाकडे
 आपला सातारा
उंब्रज हे हायवे वरील मध्यवर्ती ठिकाण गजबजलेली बाजारपेठ  उंब्रज मधील उंब्रज ते चरेगाव रस्ता  नेहमी गजबजलेला असतो दळणवळणासाठी या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो पण सध्या या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे सध्याचे  चित्र आहे

चरेगाव रोडवरील एका स्कुल समोरून ड्रेनेज चे पाणी गटार च्या बाहेर रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे प्रसारमाध्यमांनी बातमी लावली की तेवढे 2 दिवस साफसफाई होताना दिसते परत मात्र    येरे माझ्या मागल्या प्रमाणे रस्त्यावर ड्रेनेज चे पाणी जाणीवपूर्वक सोडले जाते आहे आणि त्या पाण्यामुळे mseb च्या गेट  पर्यंत मोठ्या  प्रमाणात दुर्गंधी    पसरली आहे या रस्त्यावर जवळच एक मोठे हॉस्पिटल आहे त्याच बरोबर नागरी वस्ती देखील आहे या ड्रेनेजच्या पाण्यामुळे आणि रस्त्याच्या अवतीभवती असलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे  रस्त्याने जाताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा ज्यांनी आपले ड्रेनेज जाणीव पूर्वक रस्त्यावर सोडून या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला आहे 
त्याच्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी  अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे,प्रशासनाने ही वारंवार संबंधितांना वारंवार सूचना केले आहेत तरी परिस्थिती जैसे थे तशीच आहे त्यामुळे लवकरात लवकर या दुर्गंधी पासून मुक्तता मिळावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक करत आहेत .

* सदरचे ड्रेनेज कुठून येत आहे याची ची शहानिशा करून संबंधित विभागाने  आरोग्य विभागाने याची योग्य ती चौकशी करून ड्रेनेज रस्त्यावर सोडणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी  अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे

Comments