कलयुगातील रामायण, महाभारत,
इथे कोणी साधू संत नाही आणि हम सब चोर है !
सातारा, दि.4 - प्रा.अजय शेटे.
नुकतेच कॅप्टन अशोक खरात यांच्या कृष्ण कृत्यामुळे महाराष्ट्र सह भारतातील समाज मन ढवळून निघाले.या आधीही अशा अनेक महाराज व स्व - घोषित गुरूंचे कारनामे या देशात घडले आहेत आणि त्या मुळे सर्वसामान्य लोकांचा देव व अध्यात्मा वरील विश्वास काही प्रमाणात का होईना ,डळमळीत झाला आहे.
अशा काही स्व - घोषित गुरुंमुळे भारतीय संस्कृतीतील 18 विद्यामधील सर्वात सात्विक व पवित्र असलेले ज्योतिष शास्त्र मात्र अर्ध ज्ञानी कुचेष्टा करणाऱ्या आंबट शौकिनी व्यक्तीकडून मात्र पुरते बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारतीय ज्योतिष शास्त्राचा संपूर्ण जगभर एक अभ्यासपूर्ण शास्त्र म्हणून,नावलौकीक आहे.या शास्त्राचा अनेक उच्च विद्यापीठात एक अभ्यास शास्त्र म्हणून समावेश केला गेला आहे.या क्षेत्रात अनेक मान्यवरांनी फार पूर्वी पासून
गाढा अभ्यास करून ,
अचूक निदान करत अचूक मार्गदर्शन केले आहे.या शास्त्राचे अनेक मौलिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत.या मध्ये ,भृगू संहिता सारखा प्राचीन ग्रंथ आहे.जे.कृष्णमूर्ती यांनी तर , अध्यात्म आहे शास्त्र अद्वैताचे ' या व अशा अनेक ग्रंथातून भारतीय ज्योतिष शास्त्राची विज्ञान शास्त्रातील उपायांशी असलेला सह संबंध उलघडून दाखवलेला आहे.त्यांच्या मार्गदर्शनात पुढे अनेक जण आज पर्यंत समाजाला चांगल्या पद्धतीने भविष्य मार्गदर्शन करत आहेत.ओशो उर्फ आचार्य रजनीश यांनी भारतीय भविष्य शास्त्रावर अभ्यासपूर्ण विवेचन करत अनेक टिपण्या केल्या आहेत.या महान व्यक्तीने वेद,पुराणे, उपनिषदे,दर्शन शास्त्रे यांचा केलेला अभ्यास व त्या अनुषंगाने यातील विषयांचे केलेले ग्रंथ विवेचन व ज्ञान कोणी लक्षात घेतले नाही. पण त्यांचा ' संभोग ' हा शब्द मात्र सर्वांनी डोक्यात ठेवून ,त्यांच्या बद्दल स्वतःचे अनेक गैरसमज करून घेतले.तात्पर्य काय तर, अर्ध ज्ञानी व्यक्तींनी समाज मन आणि अनेक जीवनोपयोगी मार्गदर्शक शास्त्रे बदनाम करण्याचे काम केले आहे.
भारतीय ज्योतिष शास्त्राने, बारा राशी व सत्तावीस नक्षत्रे यांच्या माध्यमातून आज कित्येक पिढ्या मानवाला मार्गदर्शन करण्याचे महान कार्य केले आहे. हा एक शारीरिक व मानसोपचार च आहे.माणसांवर कळत - नकळत अनेक प्रकारे संकटे येवून त्याला अडचणी उभ्या राहतात आणि मग तो वैफल्य ग्रस्त व्हायला लागतो.त्यावेळी भारतीय ज्योतिष शास्त्र हे ' निकटवर्तीय मित्राशी सहजतेने गप्पा माराव्यात ' इतक्या सहजतेने त्याच्या निराश मनाला उभारी देण्याचे काम करते.भारतीय ज्योतिष शास्त्र हे पूर्णपणे दैवी व अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यास परिपक्व आहे.भारतीय संस्कृतीतील श्री गणपती,श्री देवी,श्री विष्णू, श्री शिव - शंकर, श्री सूर्य नारायण,श्री दत्त,श्री हनुमान ,श्री शनी व श्री राम ई प्रमुख देव आणि त्यांचे अवतार देव तसेच या पंथांचे महाराज यांची नव विधा भक्ती उपासना करण्यास प्राधान्य देणारे महान शास्त्र आहे.अशा सात्विक दैवी व अध्यात्मिक मार्गदर्शनाने भारतीय माणूस आपला मानसिक व शारिरीक उपचार करून घेवून,अतिशय सात्विक राहून,जीवनात कशी प्रगती करता येईल ? कसे सुरक्षित व आनंदी जीवन जगता येईल.यास प्राधान्य देताना दिसून येतो.मग अशा भविष्य शास्त्राचा बहुतांशी लोकांना लाभ होत असतानाच एखादा कोणी स्व - घोषित अध्यात्मिक गुरू सदर शास्त्राचा एक घातक शस्त्र म्हणून वापर करत असेल,आणि त्यांचे मार्गदर्शन घेणारे शिष्य जर स्वतःच्या सारासार विचारसरणी आणि विवेक वादाला गहाण ठेवून,स्वतःच्या श्रद्धाचे रूपांतर जर अंधश्रध्येत करून,नको ते आचरण करत असतील तर तो भारतीय प्राचीन भविष्यशास्त्राचा दोष नसून, उपायांचा अपाय झाल्याची लक्षणे आहेत. याला सर्वस्वी आजचे स्व - घोषित गुरू व त्यांचे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग करणारे चेले कल युगातील रामायण आणि महाभारत घडवत कारणीभूत आहेत.हे सर्व सामान्य व्यक्तींनी नीट समजून घेतले पाहिजे.
तसेच आज एक जण भविष्य शास्त्रातील अध्यात्मिक गुरू वाईट मार्गाने बदनाम झाला म्हणून,अखंड महान अशा दैवी व अध्यात्मिक पाया असलेल्या भविष्य शास्त्राला सरसकट बदनाम करणे योग्य नाही.इतर अनेक सामाजिक कार्य क्षेत्रे आहेत की,ज्यात या पेक्षाही मोठे बदमाश कार्यरत आहेत.पण आपल्या कडे फक्त 'सापडेल तो चोर आणि बाकी सगळे देवाचे साधू संत अवतार ' हि उक्ती प्रचलित होत आलेली आढळून येते.
वास्तविक सर्वच क्षेत्रात एका पेक्षा एक बदमाश साधू संत काम करत आहेत.कोणी स्पर्शाची,कोणी नजरेची,कोणी पैशांची,कोणी वस्तूंची व इतर गोष्टींची चोरी करण्यात अग्रेसर आहेत.त्या मुळे इथे असे एकही क्षेत्र नाही की,जिथे सगळ्या साधू - संतांचा भरणा आहे.तर ' हम सब चोर है ! ' या न्यायाने सर्व जण आपण सगळे भाऊ भाऊ आणि सर्वजण मिळून खावू ' या युक्तीने वाटचाल करत आहेत. आणि प्रत्येकाला फक्त आपले निघू नये आणि दुसऱ्याचे सगळे बाहेर यावे असे वाटते आणि मग सरसकट एखाद्याच क्षेत्राची सरसकट बदनामी केली जाते.तेव्हा सुजाण सामान्य नागरिकांनी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितलेली सारासार 'विचासरणी आणि विवेकवाद' डोक्यात ठेवून,आपल्या जीवनाची वाटचाल करावी.
भारतीय संस्कृती मधील डोळस देव,अध्यात्म व भक्ती समजून घ्यावी. आपल्या डोळस श्रद्धा या अंध श्रद्धात रुपांतरीत होणार नाहीत यांची काळजी घ्यावी आणि भारतीय शास्त्रोक्त भविष्य शास्त्रा सह कौटुंबिक समस्या सह कर्ज, आजार,व्यसन व भौतिक प्रगती या बाबत समुपदेशनपर सर्व सात्विक शास्त्रांचे मार्गदर्शन घेवून,आपले जीवन कायम सुखी,सुरक्षित व आनंदी करण्याचा प्रयत्न करावा.भारतीय शास्त्रातील नवविधा भक्ती प्रकार हे खूप ताकदवान असून,त्यांचा वापर स्व - कल्याणा बरोबर इतरांच्या कल्याणासाठी पण केला तर पंचपल्लव वृक्षांवर बांडगुळे वाढणार नाहीत आणि ते समाज पुरुषाची प्रकृती बिघडवू शकणार नाहीत.
Comments
Post a Comment