श्री.क्षेत्र भोसलेवाडी,उंब्रज मध्ये श्री एकनाथ षष्ठी उत्सवाचे आयोजन.



श्री.क्षेत्र भोसलेवाडी,उंब्रज मध्ये श्री एकनाथषष्ठी निमित्ताने  दि .९ /१०/ ११ रोजी  उत्सवाचे आयोजन.

सातारा, दि.7-रविंद्र वाकडे.

 श्री गोपालनाथ महाराज जन्म त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सव अनुषंगाने श्री गोपाल नाथ देव ट्रस्ट व ग्रामस्थ , भोसलेवाडी,उंब्रज यांचे विद्यमाने 282 वा श्री एकनाथ षष्ठी उत्सव सोमवार दि.9 ते ते बुधवार दि.11.3.26 अखेर स .7 ते 10.30 या वेळेत,श्री क्षेत्र भोसले वाडी ,उंब्रज नजिक, ता.कराड, जि.सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला गुरुवर्य श्री .गुरुनाथ दादासो घोलप ,श्री. सुरेशराव साखवळकर , प. पु. दिगंबरदास घारे महाराज,पुणे व ॲड. डी. व्ही.देशपांडे आप्पा हे नाथ भक्त उपस्थित राहणार असून,त्यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

                   

तरी सर्व भाविक भक्तांनी या दैवी व अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ करून घ्यावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments