वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना बसवेश्वर महामंडळाचा लाभ मिळावा – काका कोयटे यांची मागणी


वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना बसवेश्वर महामंडळाचा लाभ मिळावा – काका कोयटे .
पुणे दि 11: दिलीप महाजन
 समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातीतील समाज बांधवांना जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे मत वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.
      पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथील वीरशैव सेवा मंडळाला ४२ वर्षे पूर्ण होत असून मंडळाच्या नवीन पुनर्रचनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
      या प्रसंगी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, कल्याणी उद्योग समूह व भारत फोर्ज लिमिटेड पुणेचे चेअरमन पद्मभूषण डॉ. बाबासाहेब कल्याणी, प्रणव तपस्वी ज्ञानभास्कर गुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, प.पू. श्री १०८ वेदांताचार्य गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महाराज, तसेच प.पू. १०८ गुरु सदाशिव शिवाचार्य वेळापूरकर महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Comments