महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ लाभ लिंगायत धर्मातील सर्वच्या सर्व घटकांना झाला पाहीजे.आमदार इद्रीस नायकवडी.
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ लाभ लिंगायत धर्मातील सर्वच्या सर्व घटकांना झाला पाहीजे.आमदार इद्रीस नायकवडी.
सातारा दि ०४ :- रवी वाकडे
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ लाभ लिंगायत धर्मातील सर्वच्या सर्व घटकांना झाला पाहीजे. या महामंडळात स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असली पाहीजे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रीस नायकवडी (मिरज) यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायतांना न्याय देण्याची मागणी आ. नायकवडी यांनी केली आले.आ. नायकवडी यांच्या भुमिकेचे स्वागत करीत असल्याचे प्रतिपादन बसव कथाकार प्रा.राजाराम पाटील यांनी केले आहे.
शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणा वरील चर्चेत बोलताना केली आहे. आमदार नायकवडी यांनी शासनाने तातडीने योग्य निर्णय घेण्याचीही मागणी चांगलीच लावून धरली आहे. लिंगायत धर्मातील सर्वानाच सरसकट लाभ मिळण्पाची मागणी आमदार इद्रीस नायकवडी यांनी विधानसभेत केली आहे. असेही बसव कथाकार प्रा.राजाराम पाटील यांनी सांगितले.
बसव कथाकार प्रा.राजाराम पाटील म्हणाले की,जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ लिंगायत समाजासाठी काढण्यात आलेले आहे, मात्र लिंगायत समाजाला ओबीसी म्हणून वर्गीकृत करण्याच्या प्रश्नावर अनेकांची भावना वेगळी आहे. लिंगायत समाजातील केवळ काही घटक सुमारे 2 टक्के ओबीसी प्रवर्गात मोडत असतील, तर उर्वरित 98 टक्के असलेल्या लिंगायत समाजाचे काय ? असा प्रश्न आ. नायकवडी यांनी उपस्थित केल्याचे प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले.
आ.पडळकर आ. नायकवडी लिंगायत प्रेमी = प्रा.राजाराम पाटील
जत विधानसभा मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अभ्यास क्रमात महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिरजेचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट सर्व लिंगायत समाज बांधवाना देण्यात यावा असा प्रश्न उपस्थित केला आहे.आ.पडळकर व आ. नायकवडी यांचे लिंगायत धर्म बांधवावर असणारी तळमळ दिसून आली आहे. =
एकंदरीत विचार करता लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. या प्रमुख मागणीकडे केंद्र व राज्य सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष झाले आहे. सर्वच लिंगायतांना ओबीसी आरक्षण मिळाले तरच या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देणे महत्वाचे आहे. लिंगायत लोकप्रतिनिधीं, लिंगायत प्रेमी लोकप्रतिनिधी व लिंगायत संघटनेच्या नेतेमंडळीनी प्रयत्न करण्याची मागणी बसव कथाकार प्रा.राजाराम पाटील यांनी केली आहे. -----
या संदर्भात शासनाने वस्तुस्थितीचा अभ्यास करून योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात. सर्व लिंगायताचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात यावा. लिंगायत समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळेल, अशी मागणी आमदार नायकवडी यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे.



Comments
Post a Comment